Lockdown : काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’मध्ये हॉस्पीटलमध्ये कर्मचार्‍यांनी चक्क खेळला ‘गरबा’ (व्हिडीओ)

सुरत : वृत्त संस्था  – संपूर्ण जगाला कोरोना संसर्गाने आपला विळखा घालता आहे. भारतात कोरोना सांसर्गिक रुग्णांची संख्या ५ हजार ८६५ झाली आहे. तर ४७८ जणांना उपचार करून सोडण्यात आलं आहे व १६९ जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गित १२९७ रुग्ण महाराष्ट्रातील आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सुरतमध्ये चक्क लॉकडाऊन दरम्यान रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाचं मनोरंजन करण्यात आलं.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमुळे एकीकडे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. मात्र, सुरतमधील डायमंड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनकडून रुग्णाचं मनोरंजन करण्यासाठी चक्क रात्री गरबा खेळला गेला. सरकारकडून सोशल डिस्टन्स ठेवण्याचं आवाहन करण्यात येत असताना देखील रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी गरबा खेळाला आहे. आधीच कोरोना संसर्गाचा धोका वाढत असताना रुग्णालयात अशा पद्धतीने गरबा खेळला जात असल्याने गरब्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

कोरोना संसर्गाचा वाढत प्रभाव लक्षात घेत उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यामधील १५ जिल्हातील संसर्ग प्रभावित क्षेत्रे सील करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ७७३ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहे. तर ३२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.