डोंगरामधील ‘ही’ मुलगी झाली TikTok स्टार, सोशलवर लाखो चाहते (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – डोंगरात रहाणारी एक मुलगी आपल्या टिकटॉक व्हिडीओंमुळं चर्चेत आली आहे. अनेक लोक तिचे व्हिडीओ पाहून तिचे फॅन झाले आहेत. डोंगरात राहणाऱ्या या मुलीचं नाव आहे भावना चुफाल (Bhawna Chufal). सध्या भावना टिकटॉकवर गाजताना दिसत आहे. जवळपास एका वर्षआधी तिली टिकटॉक व्हिडीओज बनवण्याचा विचार आला. यानंतर तिनं टिकॉटक व्हिडीओ बनवायला सुरुवात केली.

 

व्हिडीओ बनवण्यात आणि शेअर करण्यात सातत्य ठेवणारी भावना टिकटॉकवर फेमस होऊ लागली. पाहता पाहता टिकटॉकवर भावानाचे 11 लाख फॉलोवर्स झाले. तिच्या व्हिडीओसाठी तिला लाखा लाईक्स मिळू लागले. तिचे काही व्हिडीओ तर असे आहेत जे पाहून लोकांना प्रश्न पडायचा की ही मुलगा आहे की, मुलगी. तिचा बॉय लुक असो किंवा गर्ल लुक लोकांना तिचे सारेच लुक आवडतात.

तिनं अनेक व्हिडीओ पहाडी गाण्यांवर बनवले आहेत. भावना पहाडी वेशभुषा पिछौडा, नथ, गलोबंद घालूनच जास्त करून व्हिडीओत दिसत असते. याशिवाय बॉलिवूडमधील अनेक डायलॉग्सवरही तिनं टिकटॉक व्हिडीओ केले आहेत. इतकेच नाही तर तिनं नेपाळी, मराठी, बिहारी, हिमाचल भाषेतही टिकटॉक व्हिडीओ बनवले आहेत.

लरूपमधील पिथौरागढच्या नापड गावातील रहिवासी भावना आपल्या कुटुंबासोबत दिल्लीत राहते. तिचे वडिल गोविंद सिंह चुफाल खासगी कंपनीत काम करतात. तिची आई गंगा देवी एक गृहिणी आहे. भावना दिल्ली विविमधून स्पोर्ट्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे.

https://www.instagram.com/p/B6sboTQBrS-/