सुशांत सिंह राजपूतचा ‘हा’ चाहता इमोशनल मेसेजसोबत वाटत आहे अभिनेत्याचा फोटो असणारा Mask ! (व्हिडीओ)

ADV

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. चाहते आणि सेलेब्स अजूनही सुशांतची आठवण काढत आहेत. असाच एक चाहता आहे ज्यानं वेगळ्या अंदाजात सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

ADV

सुशांतच्या चाहत्यानं कोरोना काळात सुशांतचं निधन झाल्यानं त्याचा फोटो असलेले मास्क वाटप करून सुशांतला श्रद्धांजली दिली आहे.

सुशांतच्या चाहत्यानं कोरोनाच्या काळात काही मास्क वाटले आहेत. यावर सुशांतचा फोटो आणि एक इमोशनल मेसेजही लिहला आहे.

या मास्कवर लिहिलंय की, जिस्म से हारा हूं. रूह तो सिर्फ एक परींदा है, धडकने चल रही है अभी मेरे भाई, तू अभी भी मेरे दिल में जिंदा है.”

सुशांतचे चाहते हे मास्क फ्रीमध्ये वाटत आहेत. देवेंद्र बोरना नावाच्या चाहत्यानं हे मास्क वाटायला सुरुवात केली आहे.