Viral: CCTV फुटेजमध्ये दिसली ‘भुताची’ सावली, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या आरपार जाताना दिसली

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिलीपिन्स (Philippines) मधील पंगासीनन (Pangasinan) शहरातून एक असा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे ते समजून घेणे जवळजवळ अशक्य आहे. हे एक किराणा स्टोअरच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) आहे ज्यामध्ये एक विचित्र सावली दिसत आहे. ही सावली रस्ता ओलांडत आहे आणि प्रत्येक वाहनाच्या आरपार जाताना दिसत आहे.

द सनच्या वृत्तानुसार, हा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरातील या भागातील लोक चांगलेच घाबरले आहेत. व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की ही रहस्यमय सावली एल लॉरी, दोन कार आणि मोटरसायकलवाल्याच्या मधून आरपार जाताना दिसत आहे. असे दिसते की कोणीही त्या सावलीला पाहू शकत नाही. ज्या दुकानदाराच्या सीसीटीव्हीत हे कैद झाले त्या दुकानदाराने यास जिन (ghoul) असल्याचे सांगितले आहे, जे की एक प्रकारचे भूत असल्याचे मानले जाते. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार हे फुटेज जूनचे असून डिलीट करण्याच्या वेळी या भागावर त्याची नजर पडली होती.

व्हिडिओमध्ये काय आहे?
या व्हिडिओमध्ये माणसाच्या सावलीसारखे काहीतरी दिसत आहे जे की रस्ता पार करत आहे. ते गाड्यांच्या आरपार जाताना दिसत आहे. या सावलीला दोन पाय असल्याचे देखील दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या डिलेव्हरी बॉयच्या अगदी जवळून जाताना ते दिसत आहे. या डिलेव्हरी बॉयचे नाव मायकल फोर्टो आहे जो की हा व्हिडीओ पहिल्यापासून खूप घाबरलेल्या अवस्थेत आहे.

मायकल म्हणाला की मला अजूनही माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, मला असे वाटत होते की हे असे काही फक्त टीव्हीमध्येच दाखवतात. दुकानदार जेनी रेनाल्टोच्या म्हणण्यानुसार त्यांनाही येथे काम करण्यास भीती वाटत आहे. त्या म्हणाल्या की जेव्हा जेव्हा मी इथून जाते तेव्हा असे जाणवते की कोणीतरी माझ्याकडे टक लावून पाहत आहे.