Inspiring : स्वतःचा 62 वा जन्मदिवस ‘खास’ बनवण्यासाठी 62.4 KM धावला ‘हा’ व्यक्ती, व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन – जगात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्यातून लोकांना आश्चर्यचकित करतात. आयुष्यात काहीही साध्य करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. अशाच एका व्यक्तीची काहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

62 वर्षांचा जमसेर सिंह संधू किंवा फ्लाईंग संधू असंही म्हणू शकता, तो आपला 62 वा जन्मदिवस खास बनवण्यासाठी 62.4 कि.मी धावला. याबाबद्दलची माहिती त्याने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

जमसेर सिंह संधूने त्याच्या ट्विटमध्ये कॅप्शन मध्ये लिहिलंय, “मी माझ्या आयुष्याचे 62 वर्षे पूर्ण केले आहेत, त्या निमित्ताने मी 62.4 कि.मी अंतर धावलो. आत्ताही माझ्या वयाच्या पुढेच.”

व्हिडीओ मध्ये आपण संधूला धावताना पाहू शकतो की कोणीतरी दुसरी व्यक्ती त्याची प्रोग्रेस रेकॉर्ड करत आहे. त्यानी स्वतःचा फिटनेस ट्रेकरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. स्क्रीनशॉट नुसार, हा रन पूर्ण करण्यासाठी 7 तास 32 मिनिटं इतका वेळ लागला.

संधूचा हा व्हिडीओ पाहून लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण तर आपल्या जन्मदिवशी संधू सारखी रेस पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.