तिचं तोंड ‘काळ’ करून घातला चपलांचा हार, ‘तंत्र-मंत्र’ करत असल्यांच्या संशयावरून दिली शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 81 वर्षाच्या वृद्ध महिलेला जादू टोणा केल्याच्या आरोपावरून आणि देवाचा संदेश मानला नाही म्हणून निकृष्ठ दर्जाची शिक्षा देण्यात आली आहे. महिलेचे केस कापून तिच्या तोंडाला काळ फासून गळ्यात चपलांचा हार घालून संपूर्ण गावात महिलेची धिंड काढण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

संतप्त झालेल्या जमावाकडून महिलेच्या घरी तोडफोड करून घर जाळण्याचा प्रकार देखील करण्यात आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.त्यानंतर सरकाघाट या ठिकाणी देण्यात आलेल्या तक्रारीनुसार तब्बल 17 जणांना अटक करण्यात आली आहे. गाहर मधील समाहल गावातील ही घटना आहे.

एका प्राचीन मंदिरातील पुजाऱ्याचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. यासंबंधी गेल्या पंधरा दिवसांपासून काही स्थानिक लोक देवाच्या नावावरून लोकांना घाबरवत होते. या लोकांच्या अंधश्रद्धेचा बळी ही वृद्ध महिला ठरली आहे. महिलेच्या नवऱ्याचा खूप वर्षांपूर्वी मृत्यू झालेला आहे आणि तिला कोणी पुत्र देखील नाही. महिला काही दिवसांपर्यंत आपल्या घरी तर काही दिवस मुलीच्या घरी राहत होती.

महिला घरी नसताना लोक तिच्या घरात घुसले आणि तिच्या घराची तोडफोड केली. जेंव्हा हा सर्व प्रकार पंचायतीत पोहचला तेव्हा देवाच्या नावावरून महिलेची तक्रार डावलण्यात आली. यानंतर महिला आपल्या मुलीकडे निघून गेली. काही दिवसानंतर महिला परत आपल्या घरी आली असता लोक पुन्हा महिलेकडे पोहचले. त्यानंतर महिलेला घरातून बाहेर काढत तोंडाला काळं फासण्यात आले आणि गावात तिची धिंड काढण्यात आली. ६ नोव्हेंबर तेजी ही घटना घडलेली आहे.

या घटनेनंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. यावेळी त्यांनी ही घटना लज्जास्पद असल्याचे सांगत अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवण्याचे लोकांना आवाहन केले आहे.

Visit : Policenama.com