विराट – अनुष्काचा ‘तो’ खास क्षण कॅमेरात झाला कैद (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्याची सगळ्यात चर्चेत असलेली जोडी म्हणजे अनुष्का आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली. हे दोघे कोणत्याही कारणावरुन चर्चेत येत असतात. आता ते पुन्हा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा एक व्हिडिओ. या दोघांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का सगळ्यांसमोर चक्क एकमेकांना किस करताना दिसत आहे.

नुकतेच विराट आणि अनुष्का यांनी मुंबईमध्ये ‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स इव्हेंट’ मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील फोटो दोघांनीही आपले सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का स्टायलिश अंदाजात दिसून आले. विराटने पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता तर अनुष्काने ब्लॅक कलरचा हाइ-वेस्टेड पॅण्टसोबत क्रॉप टॉप घातला होता. हा व्हिडिओ अनुष्काच्या फॅन पेजवर शेअर केला गेला आहे. ज्यामध्ये अनुष्का विराटला किस करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B3AEAUjHxit/?utm_source=ig_embed

यावर अनुष्काने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानातील नवीन पॅव्हेलियन स्टॅंडला विराटचे नाव देण्यात आले तेव्हा विराटचा मोठा सत्कार पाहून मी आनंदाश्रू थांबवू शकले नाही. कारण ज्या मैदानावर विराटने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली त्याच मैदानावर त्याचा भव्य सत्कार ही माझ्यासाठी आणि सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.’

Visit : Policenama.com