Vitamin Deficiency | ‘या’ Vitamin च्या कमतरतेमुळे वाढतो हृदयाचा धोका ! हाडे होतात कमजोर, ‘हे’ खाल्ले तर मिळेल जबरदस्त फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vitamin Deficiency | जर तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करायचा असेल तर हेल्थवर जास्त फोकस करावा लागेल. यासाठी डाएटपासून व्यायाम आणि अनेक प्रकारच्या गोष्टी अंमलात आणणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन-के (Vitamin-K) सुद्धा आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. यामुळे हाडे आणि हृदय निरोगी राहते. याच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजार आणि समस्या (Vitamin Deficiency) होऊ शकतात. यासाठी कोणते पदार्थ खावेत ते जाणून घेवूयात…

शरीराला का आवश्यक आहे व्हिटॅमिन-के (Vitamin-K)

1. कॅन्सरपासून बचाव होतो

2. हाडांचा विकास होण्यास मदत होतो.

3. इन्सुलिन संवेदनशीलता वाढते.

4. व्हिटॅमिन-के च्या दोन घटकांपैकी व्हिटॅमिन-के1 भाज्यांमधून मिळते.

5. व्हिटॅमिन-के2 जनावरांचे मास, चीज, अंडे यापासून मिळते.

 

व्हिटॅमिन-के च्या कमतरतेची लक्षणे (Symptoms of Vitamin K Deficiency)

सांधेदुखी

मांसपेशींमध्ये अचानक पेटके येणे

हलकी जखम झाली तरी जास्त रक्त वाहणे

जखम लवकर न भरणे

दात किंवा हिरड्यांमधून नेहमी रक्त येणे

शौच करताना किंवा लघवी करताना रक्त येणे

मासिक पाळीदरम्यान जास्त वेदना होणे

शरीरात व्हिटॅमिन-के चे कार्य

रक्त गोठवण्यासाठी शरीरात आवश्यकता असते.

रक्तप्रवाह सुरळीत ठेवते.

रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील जीएलए प्रोटीन, मिनरल आणि कॅल्शियम सारख्या पोषकतत्वांना सक्रिय करून शरीरात रक्त जमा होण्यापासून राखते.

हाडे मजबूत करते.

ब्लड प्रेशर नियंत्रित करते. हृदयाचे आजार दूर ठेवते.

 

व्हिटॅमिन-के च्या कमतरतेमुळे होणार्‍या समस्या आणि रोग

अ‍ॅनीमियाचा आजार होऊ शकतो.

हाडे कमजोर होतात.

हाडांचे आजार, जसे की ऑस्टियोपोरोसिस होऊ शकते.

रक्त धमण्या कठिण होतात, डोळे कमजोर होऊ शकतात.

हृदयाचे आजार होतात.

सांधेदुखीची समस्या होते.

 

हे पदार्थ खाल्ल्याने होईल फायदा (Vitamin K Rich Food)

व्हिटॅमिन-के चा मुख्यस्त्रोत दूध, दही, पनीर आहे. जर तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन, अंड्यातून सुद्धा व्हिटॅमिन-के मिळू शकते. शाकाहारी असाल तर चीज, सॉफ्ट चीज, पालक, ब्रोकली, स्प्राऊटचे सेवन करू शकता. (Vitamin Deficiency)

 

Web Title :- Vitamin Deficiency | vitamin k rich food khealth benefits of vitamin k vitamin k deficiency symptoms prevention and remedy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nashik News | राजकारणातील वैरी एकत्र आले अन् गळ्यात गळे घालून भेटले, राऊत-फडणवीस-दरेकरांच्या भेटीने चर्चांना उधाण

Katrina Kaif | कतरीना आणि विकीच्या लग्नाची लवकरच सगळ्यांसमोर होणार घोषणा; ‘हे’ काम करून फॅन्सला करणार खुश

Mumbai Session Court | होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा नाही, मुंबई सत्र न्यायालयाची महत्त्वाची टिपण्णी