Vitamins For Eyes | ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी, पाहण्याची होईल समस्या, आजच व्हा सावध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vitamins For Eyes | डोळा हा शरीरातील सर्वात नाजूक भाग आहे. त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अनेक व्हिटॅमिन खूप महत्त्वाची असतात, ज्यासाठी हेल्दी फूड खाण्याचा सल्ला दिला जातो. अशी व्हिटॅमिन आणि त्यांचे उत्तम स्रोत जाणून घेऊया. (Vitamins For Eyes)

१. व्हिटॅमिन ए (Vitamin A) :

हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध बातमीनुसार, व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे दृष्टी कमी होते. यामुळे रातांधळेपणा येतो. व्हिटॅमिन ए साठी पालक, गाजर, बीटरूट यांसारख्या हिरव्या पालेभाज्या खाव्यात.

२. व्हिटॅमिन ई (Vitamin E) :

व्हिटॅमिन ई डोळ्यांच्या पेशींचे नुकसान टाळते. बदाम, हिरव्या पालेभाज्या जसे पालक, सूर्यफुलाच्या बिया, किवी, आंबा इत्यादींचे सेवन करू शकता.

३. व्हिटॅमिन सी (Vitamin C) :

व्हिटॅमिन सी च्या सेवनाने दृष्टी वाढते. हे रेटिनल आजार जसे की एएमडी रोगापासून संरक्षण करते. यासाठी संत्रे, किवी, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, टोमॅटो इत्यादींचे सेवन करू शकता.

४. Vitamin B6, Vitamin B9 आणि Vitamin B12 :

अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन बी६ आणि व्हिटॅमिन बी९ आणि बी१२ डोळ्यांचे आरोग्य सुधारतात. ते डोळ्यांचा अंधूकपणा दूर करतात. हे मिळवण्यासाठी दूध, केळी, सूर्यफुलाच्या बिया इत्यादींचे सेवन करू शकता. याशिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी ल्युटीन, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, थायामिन आणि रिबोफ्लेविन यांसारखे पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स आवश्यक असतात. (Vitamins For Eyes)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी