..तर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवेन : विवेक ओबेरॉय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात अभिनेता विवेक ओबेरॉय याने त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. यानंतर आता विवेक ओबेरॉय राजकारणात प्रवेश करणार का असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. विवेकने यावर भाष्य केलं आहे. जर भविष्यात कधी राजकारणात प्रवेश केला तर वडोदरामधून लोकसभा निवडणूक लढवण्यास मी उत्सुक आहे अशी इच्छा विवेक ओबेरॉयने व्यक्त केली आहे.

चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विवेकने पारूल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधळा यावेळी विवेकला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विवेकने भविष्यात वडोदरामधून निवडणुक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. दरम्यान नुकतीच भाजपा सरकारने गुजरातमधील 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात विवेक ओबेरॉयचेही नाव सामील आहे. याशिवाय या यादीत हेमा मालिनी आणि अभिनेते परेश रावल यांचाही समावेश आहे.

पीएम नेरंद्र मोदी हा चित्रपट येत्या 5 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विवेक ओबेरॉय व्यतिरीक्त यात अभिनेते मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय बरखा बिष्ट जशोदाबेन, बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश आेबेरॉय, प्रशांत नारायणन यासारखे कलाकारही प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी यापूर्वी सरबजीत, मेरी कोम यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. संदीप सिंग यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.