राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 70 गुजराती कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वालचंदनगर मेन कालॅनी येथील सेवा काॅलनी परिसरातील ७० गुजराती कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष अमरसिंह निंबाळकर बाजारपेठेतील व्यापारी विजय कांबळे,वालचंदनगर श्री स्वामी समर्थ सेवा मंडळांचे सल्लागार जितु दुरूतकर, वालचंदनगर श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सचिव अमोल राजपूत यांच्या विशेष प्रयत्नातून सोशियल डिस्टिंक्शनचे पालन करत राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील, इंदापूर तालुक्याच्या तहसिलदार सोनाली मेटकरी ,वालचंदनगर पोलिस स्टेशनचे कार्यक्षम अधिकारी दिलिप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ७० गुजराती कुटुंबीयांना गहु, तांदुळ, डेटाॅल साबण अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी भरणे यांनी समाजातील प्रत्येक घटकाची निरंतरपणे व प्रमाणिक सेवा करण्याचे काम माझ्या गुजराती बांधव वालचंदनगर परिसरामध्ये करत आलेला असून आज कोरोनासारख्या संकटाच्या प्रसंगात माझ्या गुजराती कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माझ्या हातून होताना इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मनापासून आनंद व समाधान वाटत असल्याची भरणे बोलत होते निंबाळकर, कांबळे, दुरुतकर, रजपूत कुटुंबीयांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून चांगला सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी वालचंदनगर शहरातील जेष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब दंगाणे, व वालचंदनगर ग्रामपंचायत सदस्य सुहास हिपरकर गुजराती मंडळाचे विजय सोलंकी, महेश सोलंकी, चंद्रकांत सोलंकी, समय सोलंकी तसेच गुजराती महिला भगिनी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.