Wanwadi Pune Crime News | पुणे : दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार; वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या 11 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Wanwadi Pune Crime News | चोरी व दरोडा टाकल्याची (Robbery In Pune) खबर पोलिसांना (Tip Of Robbery) देतो असा समज करुन 11 जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवली. तसेच ‘आम्ही इथले भाई आहोत, कोणाला सोडणार नाही’ असे म्हणत एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार करुन जखमी केले. ही घटना हडपसर (Hadapsar) भागातील रामटेकडी येथील कोठारी व्हिल्सच्या (Kothari Wheels Ramtekdi) बाजूला सोमवारी (दि.6) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्ररणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) एका सराईत गुन्हेगारासह 11 जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पंजाबसिंग फौजिसिंग कल्याणी (वय-35 रा. कोठारी व्हिल्सच्या बाजूला, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रविसिंग शामसिंग कल्याणी, हुकूमसिंग रामसिंग कल्याणी, रामसिंग मोहनसिंग कल्याणी, अजयसिंग हुकूमसिंग कल्याणी, ऐलानसिंग रामसिंग कल्याणी, जिंदालसिंग रामसिंग कल्याणी, हिंदूसिंग रामसिंग कल्याणी, राजूसिंग रामसंग कल्याणी, निहालसिंग शामसिंग कल्याणी, सोनिहालसिंग शामसिंग कल्याणी, बसंतीकौर शामसिंग कल्याणी यांच्यावर आयपीसी 307, 324, 323, 143, 147, 148, 149, 427, 504, 506(2), 120(ब) सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या शेजारी राहतात. चोरी व दरोडा घातल असताना त्याची खबर पोलिसांना देतो असा समज करुन आरोपींनी कटकारस्थान करुन बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी त्यांच्या हातील लोखंडी तलवार व इतर हत्यारे घेवून फिर्यादी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच आरोपी रविसिंग कल्याणी याने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात व पायावर तलवारीने वार करुन जखमी केले. (Wanwadi Pune Crime News)

तर आरोपी हुकूमसिंग कल्याणी याने फिर्यादी यांच्या नातवाच्या डोक्यात तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. हातातील हत्यारे हवेत उंचावून ‘आज यांची विकेटच पाडायची, कोणी त्यांना सोडवण्यास आले तर त्यांचीही विकेट टाकू. आम्ही इथले भाई आहोत, कोणाला सोडणार नाही’ अशी धमकी आरोपींनी दिली. तसेच फिर्यादी यांच्या मुलाच्या व नातवाच्या दुचाकीवर दगड व विटा मारुन नुकसान करुन इतर वाहनांची देखील तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवली. आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये फिर्यादी यांच्या मुलाला व नातवाला मुका मार लागला.

घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी ऐलानसिंग कल्याणी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Record) आहे.
त्याच्यावर खोपोली, रायसनी, नेरळ पोलीस ठाण्यात 9 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | दोन लाख पुणेकरांनी घेतल्या ‘व्होटिंग स्लिप’; मोहोळ यांच्या प्रभावी यंत्रणेचा नागरिकांना फायदा

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांनी दिले चोख प्रत्युत्तर, ”शरद पवार मुद्दाम आजारी पडले, हा अजितदादांचा विचार हास्यास्पद”

Solapur Lok Sabha | धक्कादायक! सोलापुरात मतदाराने पेट्रोल टाकून जाळली EVM मशीन, घटनेनंतर बंदोबस्त वाढवला (Video)

Murlidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर – मुरलीधर मोहोळ