धक्कादायक ! पुन्हा एकदा ‘मॉब लिंचिंग’, युवकाला तुडवत लोकांनी दिली ‘जय श्रीराम’ची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या कैमूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. जिल्हा वॉर्ड सदस्यांच्या मुलाने एका युवकाला गोळी मारली आणि उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमोर आरोपीची जोरदार धुलाई केली. यावेळी जय श्रीरामच्या जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. याचाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यात आरोपी असलेल्या मुलाला जमावाकडून मारहाण होताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे
आरोपी असलेल्या युवकाला लोकांनी घेरले आहे आणि लोकांमधील एक तरुण या आरोपीला जोरजोरात मारत आहे. बाजूलाच पोलीस देखील उभे आहेत आणि घोळक्यातील एक तरुण जोर जोरात जय श्रीरामच्या घोषणा देताना स्पष्ट दिसत आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की एकदा पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. मात्र तरुणांनी कर्मचाऱ्यालाच बाजूला केले. एवढेच नाही तर जमा असलेल्यांपैकी सगळ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.

आरोपीला लोकांनी एवढा चोप दिला की त्याला उपचारासाठी दवाखान्यात भरती व्हावे लागले. लोक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या आरोपीला जीवे मारण्याची मागणी पोलिसांकडे केली. यानंतर संतप्त जमावाने आपत्कालीन गेट तोडले आणि खिडक्यांवर दगडफेक देखील केली.

रुग्णालयात लोकांनी घातली धुडगूस
संतप्त लोकांनी आरोपी उपचार घेत असलेल्या रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला. यादरम्यान प्रशासनाला लोकांवर लाठीचार्ज देखिल करावा लागला. त्यानंतर एस.पी. दिलनवाज यांनी रुग्णालयात जाऊन लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले. आपापसातील वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बातचचा व्हिडीओ मार्क्सवादी कम्यूनिस्ट पार्टीचे माजी खासदार आणि पश्चिम बंगालचे माजी मंत्री मोहम्मद सलीम यांनी शनिवारी ट्विटवरून पोस्ट करत हा व्हिडीओ पश्चिम बंगालचा असल्याचे सांगितले होते. मात्र ही घटना बिहारमधील कैमूर ठिकाणची आहे.

Visit : Policenama.com