वर्धा : नागपूर -मुंबई महामार्गावर ट्रक उलटल्याने रस्त्यावर पडला माशांचा सडा

वर्धा : नागपूर -मुंबई महामार्गावरील सत्याग्रही घाटामधील वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावरच उलटला. त्यामुळे ट्रकमधील माशांचा संपूर्ण रस्त्यावर सडा पडल्याचे दिसून येत होते.

कोलकत्ता येथून एक ट्रक मासळी घेऊन मुंबईला जात होता. शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सत्याग्रही घाटात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्यामध्येच वळणावर उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. मात्र, त्यामधील मासळी रस्त्यावर दूरवर अत्याव्यस्तपणे पडली. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तळेगाव पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक रोडच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत केली.