हत्तीनं ‘मस्तावल’ गेंडयाला शिकवला धडा, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील म्हणाल… (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही हत्तीचे खूप कौतुक कराल. या व्हिडिओमध्ये हत्तीने आपल्या भागातून गेंड्याला पळवण्यासाठी जे साधन वापरले, ते कौतुकास्पद आहे. या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, एक गेंडा चरत-चरत हत्तींच्या क्षेत्रात जातो आणि मजेत चरू लागतो. गेंड्याचा हा साहसीपणा हत्तींना आवडला नाही. ते ताबडतोब गेंड्याला पळून जाण्याचे संकेत देतात, परंतु गेंडा चरण्यात इतका व्यस्त आहे की तो हत्तींना सरसकट टाळतो.

हे पाहून हत्ती आपल्या क्षेत्रातून गेंड्याला पळवण्यासाठी आणखी एक टेक्नीक वापरतात. या टेक्नीकमध्ये हत्ती जवळ पडलेले लाकूड उचलून गेंड्याला संकेत देतो की येथून निघून जा, हे माझे क्षेत्र आहे. तरीही गेंडा पळून जात नाही. त्यानंतर हत्ती खोडात लाकूड उचलून गेंड्याला मारण्यासाठी पळतो. एका क्षणासाठी गेंडा लढण्यास पुढे सरसावतो, पण दुसर्‍या क्षणी त्याला समजते की पळून जाण्यातच भलाई आहे. यानंतर गेंडा तेथून पळून जातो.

व्हिडिओला सुशांत नंदा यांनी शेअर केले आहे
हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडिया ट्विटरवरुन त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे- हत्तीने रागावलेल्या गेंड्याला पळवण्यासाठी लाकडाची मदत घेतली. इतर प्राण्यांना पळवून लावण्यासाठी हत्ती नेहमी लाकडाच्या तुकड्यांची मदत घेतात. येथेही हत्ती गेंड्याला पळवण्यासाठी संकेत देत आहे. पळून जा, अन्यथा या तुकड्याने तुला जोरदार मारहाण केली जाईल. हा इशारा पुरेसा आहे.

व्हिडिओला १८ हजार लोकांनी पाहिले आहे
या व्हिडिओची बातमी होईपर्यंत १८ हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि १ हजारहून अधिक लोकांना आवडले आहे. तसेच ३३३ लोकांनी याला रीट्वीट केले आहे, तर ४८ लोकांनी कमेंट केली असून त्यांनी हत्तींच्या टेक्नीकचे कौतुक केले आहे.