आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या विधानानंतर राज्यात खळबळ उडाली. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये होणार नाही. आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय, काँग्रेस-राष्ट्रवादी थकलेत हे विधान कदाचित सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत:च्या वयावरून केले असावे असे अजित पवार यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

पवार घराण्यातील तरुण पिढी भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना सांगितले की, चंद्रकांत पाटील माझ्याबद्दल बोलणार नाहीत, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलण्याची शक्यता नाही कारण ती तरुणी आहे. मग पुढची पिढी कोण हे आता घरी जाऊन विचारतो असं सांगत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. चंपा यावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले सध्या सगळीकडे शॉर्ट शब्द वापरतात म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नाव चंपा. उद्धव ठाकरे यांचे नाव उठा असे म्हणत उद्धव ठाकरे आता ‘उठा’ असा टोला लगावला.

मुलाखती दरम्यान पक्षांतर करणाऱ्या नेत्यावर विचारले असता ते म्हणाले, अनेक नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी भाजपने प्रलोभन दिली. सर्वात जास्त त्रास पद्मसिंह पाटील कुटुंब सोडून गेल्याचा झाला. शरद पवार यांच्या सुरुवातीच्या काळात ठाम पणे त्यांच्यासोबत होते. शेवटी राजकारण असतं पण तुमच्या गरजेला कुटुंब धावून येतं. त्यामुळे तो त्रास झाला असे अजित पवार यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

You might also like