…म्हणून खासदार नवीनत राणांनी दिला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतक-यांना अद्यापही मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतक-याची दिवाळी अंधारात जात आहे. या शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यासमोर (uddhav-thackerays-matoshri-bungalow) रविवारी (दि. 15) आंदोलन करण्याचा इशारा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (mp-navneet-rana) यांनी दिला आहे.

खासदार राणा आणि त्यांचे पती व आमदार रवी राणा हे गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा खासदार राणा यांनी ठाकरे सरकारची अडचण वाढवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने आमदार रवी राणा यांनी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या दरम्यान रवी राणा यांच्यासह 110 कार्यकर्त्यांना अटक झाल्याने खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत राज्य सरकारला इशारा दिला आहे.

रवी राणा यांना अटक
शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी व लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत. यासाठी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रस्ता रोको करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.त्यामुळे आमदार राणा यांच्यासह 110 शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी महामार्गावर टायरची जाळपोळही केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्याने आम्ही सुद्धा जेलमध्ये दिवाळी साजरी करू, असा इशारा रवी राणा यांनी दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. ठाकरे सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली.