पुण्यातील सदाशिव पेठेत थरार : ‘तो’ आला होता संपुर्ण कुटुंबालाच संपविण्यासाठी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सदाशिव पेठेतील टिळक रस्त्यालगतच्या एका गल्लीत तरुणावर अ‍ॅसिड टाकल्यानंतर गोळी झाडून आत्महत्या करणारा सिद्धराम कलशेट्टीच्या सॅकमध्ये आणखी हत्यारं आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या बॅगमध्ये पंच, २ कोयते, २ चाकू अशी हत्यारं आढळून आली. त्यामुळे तो अख्ख्या कुटुंबालाच संपविण्याच्या इराद्याने अक्कलकोटहून पुण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे.

सिद्धराम विजयकुमार कलशेट्टी (वय २५, रा. अक्कलकोट) हा तेलाचा व्यापारी आहे. त्याचा अक्कलकोट येथे व्यवसाय आहे. तर रोहीत खरात हा पुण्यात लॉ चे शिक्षण घेतो. तर त्याची आई ज्योतिष विशारद आहे. रोहित आणि त्याची आई अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांची ओळख झाली. या ओळखीतून त्यांची फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यावेळी अश्लील मेसेज पाठविला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात रोहितच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर सिद्धरामला अटक केली. तो जामीनावर सुटला होता.

दरम्यान, मध्यंतरीच्या काळातील त्याच्या घडामोडी समोर आल्या नाहीत. मंगळवारी रात्री कलशेट्टी संपूर्ण तयारीनिशी आला होता. त्याने प्रथम स्वप्नगंधा अपार्टमेंटसमोर मैत्रिणीशी गप्पा मारत उभ्या असलेल्या रोहितवर असिड फेकले. त्यानंतर तेथून तो शेजारील इमारतीत लपला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केल्यावर त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली आणि तो इमारतीच्या डक्टमध्ये पडला. त्याच्या पाठीवर एक बॅग होती. ती पोलिसांनी हस्तगत केली. तेव्हा त्याच्या बॅगमध्ये मारामारी करायचा पंच, २ कोयते व २ नवे कोरे चाकू होते. त्याचबरोबर गावठी पिस्तुलही होते. त्यावरुन तो मोठे हत्याकांड करण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे. कलशेट्टीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येत असून त्याचे नातेवाईक गावावरुन आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like