Weather in Maharashtra | पूर्व विदर्भात ढगाळ हवामान, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार

पुणे न्यूज (Pune news)  : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – यंदाच्यावर्षी मान्सून (Monsoon Rain) लवकर आला आहे. सुरुवातीच्या काही दिवसांत मान्सूनने (Monsoon Rain) दमदार हजेरी लावली. परंतु मागील तीन आठवड्यापासून राज्यात पावसाने (Rain) दडी मारली आहे. याचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचं संकट आलं आहे. शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा (Waiting rain) आहे. जून महिन्यात दिमाखात आगमन केलेल्या पावसानं मागील 20 दिवसांपासून दडी मारली आहे.

या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस

राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाल्यानंतर मागील 10 ते 12 दिवसात खूपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी शेतकऱ्यांना आणखी एक आठवडा वाट पहावी (Wait a week) लागणार आहे. आज दक्षिण कोकण (South Konkan), गोवा (Goa), कर्नाटक (Karnataka) आणि केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटून (Monsoon clouds over the Kerala coast) आले आहेत. या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Light to moderate rain) पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील घाट परिसर, पूर्व विदर्भात (East Vidarbha) ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि कोल्हापूर (Kolhapur) या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या (lightning storms) सरी कोसळणार आहेत.

काय असेल मुंबईची परिस्थिती ?

सुरुवातीला मुंबईमध्ये (Mumbai) चांगला पाऊस पडला. परंतु मागील 10 ते 12 दिवसांत मुंबईत खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा सांताक्रुझ (Colaba Santacruz) वेधशाळेनं जारी केलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरात मागील 10 दिवसांचा पावसाचा आलेख एकरेषीय राहिला आहे. पहिल्या 1-2 पावसामुळे हा आलेख किमान सरासरी पावसापेक्षा वरच्या दिशेला आहे. आज मुबंई आणि ठाणे परिसरात (Mumbai and Thane area) कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.

पुढील आठवड्यात तुरळक पाऊस

दक्षिण कोकण South Konkan आणि घाट परिसरात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातही (East Vidarbha) तुरळक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहिल. पुढील आठवड्यात 5, 6 आणि 7 जुलैला मात्र दक्षिण महाराष्ट्रासह (South Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Weather in Maharashtra | cloudy weather in vidarbha chance of rain in pune

 

हे देखील वाचा

7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे

New Liquor Licence | मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होण्याची शक्यता

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी

Modi Government । नोकरदारांसाठी खुशखबर ! आता सुट्ट्या वाढणार तर PF, पगारात होणार मोठा बदल; लवकरच मोदी सरकार निर्णय घेणार