Weather Updates : देशाच्या अनेक भागात आज वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता, 1 जूनला येणार मान्सून !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात गुरुवारी झालेल्या तुरळक पावसामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. हवामान विभागाने पुढील 24 तासात पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह उत्तर भारताच्या अनेक राज्यात गडगडाटासह वादळीवार्‍यास तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या मैदानी भागात तापमान शुक्रवारपासून आणखी कमी होईल. पुढील दोन दिवसापर्यंत पश्चिम बंगालमध्ये पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

मान्सूनची चाहूल, 1 जूनला धडकणार

या दरम्यान मान्सूनची चाहूल सुद्धा लागत आहे. हवामान विभागाने सांगितले की, बंगालच्या खाडीवर चक्रीवादळाची स्थिती तयार झाल्याने दक्षिण पश्चिम मान्सून केरळात 1 जूनला धडकणार आहे. सामान्यपणे मान्सून केरळात 1 जूनलाच येतो. बंगालच्या खाडीतील स्थितीमुळे मान्सूनला पोषक वातावरण आहे.

रविवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागानुसार, 31 मेपर्यंत दक्षिण द्विपकल्पीय भारताच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोबतच 30-31 मेरोजी केरळ आणि लक्षद्वीपमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने त्रिपुरा आणि मिझोराममध्ये पुढील 24 तासात जोरदार पाऊस आणि आसाम तसेच मेघालयमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

यावर्षी पाऊस सामान्य

हवामान विभागाने म्हटले दक्षिण पूर्व आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रात 31 मेपासून 4 जूनच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. ही स्थिति केरळात एक जूनला मान्सून येण्यासाठी अनुकूल आहे. देशात यावर्षीत पाऊस सामान्य होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत छान हवामान, पावसाची शक्यता

दिल्लीत गुरुवारी सांयकाळी ढग आल्याने आणि जोरदार वार्‍यासह तुरळक पावसामुळे गरमीपासून थोडा दिलासा मिळाला. तापमान थोडे कमी झाले. बुधवारी 47 डिग्री कमाल तापमानानंतर गुरुवारी 41.8 डिग्री तापमान नोंदले गेले. 29-30 मेरोजी दिल्ली-एनसीआरमध्ये 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि वादळीवार्‍यासह पावसाची शक्यता आहे.

उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये हवामान बदलल्याने तापमानात घसरण झाली. उत्तरकाशी, टिहरी, चमोली आणि रुद्रप्रयागमध्ये हलका पाऊस पडला. पर्वतीय भागात पावसाची शक्यता आहे. येथे 31 मेपर्यंत जोरदार वारे वाहण्याची आणि पावसाची शक्यता आहे.

पंजाबमध्ये गुरूवारी काही भागात जोरदार पाऊस झाला. येथे 29 आणि 30 मेरोजी तुरळक पावसाची शक्यता आहे.

हरियाणातही तुरळक पाऊस पडल्याने उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवसात येथे वादळासह पावसाची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुढील 24 तासात उत्तर प्रदेशात काही ठिकाणी पाऊस, वादळीवार्‍याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये गुरुवारी अनेक भागात जोरदार पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. येथे घर कोसळल्याने एक महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. येथे आगामी 24 तासात बीकानेर, चूरू, हनुमानगढ़, श्रीगंगानगर, नागौर, जयपुर, जोधपुर, अलवर, भरतपुर, सीकर, दौसा आणि झुंझुनूं जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वार्‍याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात गुरूवाती पाऊस पडल्याने काही भागात उष्णतेपासून दिलासा मिळाला. तर काही ठिकाणी वादळीवार्‍यामुळे मोठे नुससानही झाले आहे.

प. बंगालमध्ये गुरूवारी काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते, काही ठिकाणी तुरळक पाऊसही झाला. पुढील दोन दिवसात पश्चिम बंगालमध्ये गंगा मैदानी प्रदेशात गडगडासह तुरळक पावसाचा अंदाज आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like