कोहली आणि धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये ‘हा’ फरक : जाँटी रोड्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात क्रिकेटचा कुंभमेळा म्हणचेच विश्वचषकाचा जोर सुरु आहे. त्यामुळे क्रिकेटवेड्या भारतात देखील यावेळी कोण जिंकेल याच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. काहीच दिवस या कुंभमेळ्याला सुरुवात होण्यास राहिले असताना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्या कॅप्टन्सीवर बऱ्याच चर्चा होत आहेत. मात्र आता या विषयावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी रोड्स याने भाष्य केले आहे.

१९८३ साली कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वकप जिंकल्यानंतर तब्बल २८ वर्षांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने कप जिंकला. यावेळी मात्र धोनी कर्णधार पदी नसून विराट कोहली असल्याने तो अशी कामगिरी करू शकतो का ? याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. याविषयी बोलताना जाँटी रोड्स म्हणाला कि, धोनी आणि कोहली हे दोघेही वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत. नेतृत्व करण्याची पद्धत देखील वेगळी आहे. धोनी समोरच्या माणसाच्या मानसिकतेशी खेळतो, त्याच्या डोक्यात काय चालू आहे हे धोनीला कळते. त्यानुसार तो कामगिरी करतो आणि दुसऱ्या खेळाडूंकडून करून देखील घेतो. तर दुसऱ्या बाजूला कोहली आपल्या कामगिरीच्या जोरावर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. कर्णधाराने स्वत: दमदार कामगिरी करून संघापुढे आदर्श निर्माण करावा, अशी कोहलीची शैली आहे.” त्यामुळे कोहली धोनीपेक्षा वेगळा ठरतो.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनेक माजी खेळाडूंनी धोनीच्या अनुभवाविषयी भाष्य केले होते, त्याचप्रमाणे कुलदीप यादव याने देखील धोनीचे सल्ले फार उपयोगी पडतात असे म्हटले होते.