मनुष्याच्या मासाची ‘चव’ कशी आहे ?, शिक्षकानं व्हिडीओ दाखवून मुलांना सांगितलं, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या जगात जसे अनेक जण मांसाहारी आहेत तसेच शाकाहारी देखील अनेक जण आहेत. परंतु काय तुम्ही हे सांगू शकता का,की माणसाने माणसाच्या शरीराचे मांस खाल्ल्यावर ते कसे लागते ? हेच सांगण्यासाठी एका इंग्रजीच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना एक व्हिडीओ देखील दाखवला मात्र शिक्षकाला हे चांगलेच महागात पडले आहे. दक्षिण कोरियामधील हा सर्व प्रकार आहे.

शिक्षकाला याबाबत मुलावर अत्याचार या कायद्याला सामोरे जावे लागले आहे. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा सीसीटीव्ही फुटेज शोधले गेले. विशेष म्हणजे यामध्ये स्पष्ट दिसून आले की, शिक्षक मुलांना मानवाचे मांस याबाबतची डॉक्युमेंटरी दाखवत आहे आणि सर्व मुले घाबरलेल्या अवस्थेत बसून आहेत.

2016 मध्ये बीबीसीने बनवलेल्या डॉक्युमेंटरीचे स्क्रिनींग यावेळी शिक्षकाने मुलांसमोर केले होते. चार मिनिटांचा हा व्हिडीओ होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तणावामुळे ग्रस्त झालेल्या मुलांवर उपचार सुरु असल्याचे समजते. कारण हा व्हिडीओ पाहून अनेक मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचे समजते.

फेसबुक पेज लाईक करा –