जाणून घ्या Netflix Direct काय आहे ?, ज्यामुळं केबल TV चॅनेलप्रमाणे पाहू शकाल Netflix Movie आणि show

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नेटफ्लिक्स (Netflix) नवीन फीचरवर काम करत आहे, जे नेटफ्लिक्स डायरेक्ट (Netflix Direct) म्हणून ओळखले जाईल. त्याची टेस्टिंग फ्रान्समध्ये सुरू झाली आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते रिअल टाइम टीव्ही चॅनेलसारखे चित्रपट आणि शो चा आनंद घेण्यास सक्षम असतील. हे टीव्ही पाहण्याच्या जुन्या पॅटर्नवर आधारित असेल. जिथे चित्रपट आणि टीव्ही शो त्यांच्या पद्धतीने चालू राहतील. म्हणजेच नेटफ्लिक्स वापरकर्ते त्यांच्या स्वत:च्या हिशोबानुसार चित्रपट आणि शो निवडू शकणार नाहीत आणि चित्रपट आणि शो दोघांनाही रेकॉर्ड किंवा पॉज करू शकणार नाहीत.

काय फायदा होईल

नेटफ्लिक्स डायरेक्ट केबल टीव्ही चॅनेलसारखे असेल. म्हणजे आपण नेटफ्लिक्स लायब्ररीमधून कोणतीही सामग्री निवडून टीव्ही किंवा वेब शो पाहण्याच्या मनःस्थितीत नसल्यास आपल्याजवळ नेटफ्लिक्स डायरेक्ट एक ऑप्शन म्हणून उपलब्ध असेल, ज्याच्या मदतीने केबल टीव्हीप्रमाणे नेटफ्लिक्स डायरेक्टला ओपन करून टीव्ही आणि शोज पाहिले जाऊ शकतात. एखादा चित्रपट आणि शोज किती वेळ लाइव्ह होईल? याची निवड नेटफ्लिक्सद्वारे केली जाईल आपल्याद्वारे नाही. जर वापरकर्त्यास आपल्या हिशोबाने टीव्ही आणि शोज पहायचा असेल तर त्यांना थेट डायरेक्ट फीचरला बंद करावे लागेल.

कोण वापरण्यास सक्षम असेल

वापरकर्त्यांना नेटफ्लिक्स डायरेक्टसाठी स्वतंत्रपणे सब्सक्रिप्शन घेण्याची आवश्यकता नाही. ज्या वापरकर्त्यांकडे आधीपासून नेटफ्लिक्सचा लॉग-इन पासवर्ड आहे, ते नेटफ्लिक्स डायरेक्ट सेवेचा आनंद घेण्यास सक्षम असतील. या सेवेचा आनंद घेण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्ट टीव्हीमध्ये अ‍ॅप स्थापित करावा लागेल. ही एक वेब आधारित सेवा असेल.

फ्रान्समध्ये सुरू झाली सेवा

नेटफ्लिक्स डायरेक्टला 5 नोव्हेंबर रोजी फ्रान्सच्या काही भागात रोलआऊट करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सच्या मते, डिसेंबरपर्यंत ही सेवा संपूर्ण फ्रान्समध्ये लागू केली जाईल. कंपनीचा असा विश्वास आहे की फ्रान्समध्ये टीव्ही पाहण्याची जुनी परंपरा बर्‍यापैकी लोकप्रिय आहे, जिथे लोक आपल्या हिशोबाने कन्टेन्ट निवडणे कमी पसंत करतात. अशा परिस्थितीत फ्रान्समध्ये नेटफ्लिक्स डायरेक्ट सर्व्हिस सुरू केली गेली आहे.

नेटफ्लिक्स सेवा भारतात कधी येईल?

नेटफ्लिक्स डायरेक्ट सेवेला भारतात किंवा इतर देशात लागू केले जाईल की नाही, सध्या याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु हे नक्की आहे की भारतातील मोठ्या लोकसंख्येलाही पारंपारिकपणे टीव्ही पाहणे आवडते. तसेच, बरेच लोक नेटफ्लिक्स सारख्या ओटीटी आधारित अ‍ॅप्स वापरण्यास सक्षम नाहीत. अशा लोकांसाठी नेटफ्लिक्स डायरेक्ट सर्व्हिस खूप फायदेशीर ठरू शकते.