माहितीय का ? आपल्या देशाचे नाव ‘भारत’ का पडलंय ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाची आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. जसे की आपल्या देशाचे अधीकृत नाव काय आहे ? आणि देशाला हे नाव का आणि कसे देण्यात आले. याबाबत आपण कधीच खोलात जाऊन विचार करत नाही कारण आपल्याला माहिती आहे हिंदीमध्ये देशाचे नाव भारत आणि इंग्रजीमध्ये इंडिया असे आहे. याबाबतची खात्री तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यलयात करून घेऊ शकता ज्या ठिकाणी देशाच्या नावाचा उल्लेख अशाप्रकारेच केला जातो.

देशाचे हे नाव संविधानात देखील आहे. तुम्ही देशाला कोणत्याही नावाने बोलवा परंतु कायदयानुसार हेच नाव अधिकृत आहे. तसेच भारताला हिंदुस्तान, आर्यावर्त, जम्बूद्वीप या अशा नावाने देखील ओळखले जाते. परंतु परंपरेनुसार संविधानात देखील देशाचे नाव भारत हेच ठेवण्यात आलेले आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का मुळात भारत हे नाव कसे पडले आणि त्याला इंडिया का म्हणतात ?

नावाबाबत दोन कहाण्या प्रसिद्ध आहेत काही वेदांत असे सांगतात की, चंद्रवंशी राजा दुष्यंत आणि विश्वामित्र यांची पुत्री शकंतुलाचा पुत्र भरत याच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले. परंतु ऋग्वेदानुसार भारत हे नाव सूर्यवंशी राजा भरत याच्या नावानुसार देण्यात आले आहे. ऋग्वेदाची व्याख्या सांगणाऱ्या वेदांतानुसार मनूचे वंशज ऋषभदेवला दोन पुत्र होते भरत आणि बाहुबली. बाहुबलीला वैराग्य प्राप्ती झाल्यानंतर भरतला चक्रवर्ती सम्राट बनवावे लागले. तेव्हापासून देशाला भारतवर्ष असे म्हणण्यात आले.

तेव्हापासून येथे राहणारे मुळ वंशज भारती म्हणून ओळखले जाऊ लागले आणि यामुळेच पांडव आणि कौरवांमध्ये झालेल्या युद्धाला महाभारत असे म्हणण्यात आले होते. कारण हे युद्ध एकप्रकारे भारतीयांच्या हक्कासाठी होते म्हणून याला महाभारत असे संबोधले गेले असल्याचे व्याख्याकार सांगतात.

भारताला इंडिया हे नाव कधी पडले
भारताला इंडिया कधीपासून म्हणतात हे निश्चित माहिती नाही परंतु हा शब्द ब्रिटिशाना भारताला दिला होता. इंडिया शब्दाची उत्पत्ती ही सिंधू शब्दातून झालेली आहे जो पहिल्यांदा युनानींकडून प्रचलित करण्यात आला होता.

हिंदुस्थान किंवा आर्यव्रत हे नाव का नाही पडले
भारताला हुंदुस्थानच्या नावाने देखील ओळखले जाते. कदाचित संविधानात या नावाला स्थान दिले नसेल कारण हिंदुस्थान हा शब्द एका धर्माला उद्देशून आहे परंतु भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे. मात्र आपण देशाला भारत म्हणून किंवा हिंदुस्थान किंवा इंडिया देशाच्या प्रती भावना तर त्याचा असतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/