तुमचं क्रेडिट, डेबिट कार्ड हॅक झाल्यास तात्काळ करा ‘हे’ काम, अन्यथा लाखोंची होईल फसवणूक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या लवकर काम होण्यासाठी ऑनलाइन बँकिंग आणि डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळेच तांत्रिक गडबड करून फ्रॉडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जर तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हॅक झाले आहे असे तुम्हाला वाटल्यास ताबडतोब या गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला आर्थिक फटका बसणार नाही.

लगेच बँकेला कळवा
क्रेडिट , डेबिट कार्ड हॅक झाले आहे असे लक्षात येताच ताबडतोब आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन या बाबत माहिती द्या. तसेच बँकेच्या कस्टमर केअरला याबाबतची माहिती देऊन उपाय विचारू शकता. जितक्या लवकर तुम्ही बँकेला कळवाल तितक्या लवकर यावर ऍक्शन घेतली जाईल.

इमेल करा
कस्टमर केअरला कॉल करून कार्ड ब्लॉक केल्यानंतर या फ्रॉड बद्दल इमेल लिहून बँकेला कळवा. पुराव्यासाठी तुम्ही या मेलसोबत बँकेच्या स्टेटमेंटचे स्क्रिनशॉट किंवा मेसेज पाठवू शकता.

कार्ड लगेच ब्लॉक करा
आपल्या खात्यातील पैसे कमी होताहेत हे लक्षात येताच तुम्ही लवकरात लवकर कस्टमर केअर ला कॉल करून आपले कार्ड ब्लॉक करा आणि तात्काळ बँकेत जाऊन माहिती द्या.

नुकसान भरपाईसाठी अर्ज करा
जर तुमच्या खात्यातील पैसे गायब झाले असतील तर लवकरात लवकर याबाबतची तक्रार दाखल करून भरपाईसाठी बँकेत अर्ज दाखल करा. जर तीन दिवसांच्या आत तुम्ही भरपाई साठी अर्ज केला नाही तर तुम्हाला पूर्ण प्रक्रियेसाठी 120 दिवस लागू शकतात.

Visit : Policenama.com