WhatsApp युजर्ससाठी खुशखबर ! ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आणतय ‘मिस्टर इंडिया’ फीचर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने नव्या वर्षात आपल्या यूजर्ससाठी खास फीचर आणले आहे. आता चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्सासाठी नेहमीच नवनवे फीचर आणते. आता असेच एक भन्नाट फीचर कंपनी लवकरच लॉन्च करणार आहे. डिसअ‍ॅपेरिंग मेसेज असे या नव्या फीचरचे नाव असणार आहे. यामुळे मेसेजचा वेळ ठरवता येणार आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी एका भन्नाट फीचरवर काम करत आहे. यामध्ये पाठवलेला मेसेज किती वेळ दिसेल याची वेळ पाठवणाऱ्याला ठरवता येणार आहे. म्हणजेच समोरच्याला कितीवेळ मेसेज दिसणार हे यूजर्स ठरवू शकतात. ही वेळ संपल्यानंतर चॅट अपोआप डिलीट होईल. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हे फीचर लवकरच देण्यात येईल. हे सिलेक्ट केल्यावर सर्व चॅट गायब होईल. टेलिग्राम या मेसेजिंग अ‍ॅपने यापूर्वीच हे फीचर यूजर्सला उपलब्ध करुन दिले आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेले मेसेज काही वेळात सर्वांसाठी डिलीट करता येतात. यावेळी समोरच्याला डिलिटेड असे दिसते. परंतु या नव्या फीचरमुळे असे दिसणार नाही. टाइम एक्स्पायर असे दिसेल असे सांगितले जात आहे. कॉल वेटिंग हे देखील नवे फीचर देण्यात आले आहे. ज्याद्वारे कॉल वेटिंगवर ठेवून मेसेज करता येईल. कंपनीने आयओएससाठी हे फीचर रोलआऊट केले आहे, स्क्रीन टच देखील आधिक चांगला देण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स ऑडिओ कॉल दरम्यान वेटिंग कॉल उचलू शकतात. यामुळे वेटिंग कॉल कट करण्याची आणि रिसीव्ह करण्याची सुविधा यूजर्सला मिळेल. एका ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप लॉग इन असेल तर लॉग आऊट केल्याशिवाय दुसरीकडे लॉग इन करता येणार नाही. परंतु एकाच वेळी अनेक ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप चालणार आहे. अनेक ठिकाणी तुम्ही लॉग इन करु शकतात. सध्या व्हॉट्सअ‍ॅप मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट वर काम करते. आयफोन यूजर्ससाठी कंपनीने रजिस्ट्रेशन नोटिफिकेशन फीचर रोलआऊट केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –