IPL फॅन्ससाठी Whatsapp कडून स्पेशल गिफ्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपने आपल्या ग्राहकांकरिता नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. आता व्हॉट्सॲपने नवीन फिचर आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने मागील वर्षी स्टिकर फीचर लाँच केले होते. या फीचरचा वापर युजर्सकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आता IPL फॅन्ससाठी क्रिकेट स्पेशल स्टीकर्स फीचर लाँच केला आहे.

सध्या हा स्टीकर पॅक व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिसत नाही तर तो अ‍ॅड करावा लागतो. एकदा तुम्ही स्टिकर पॅक डाउनलोड करुन इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला इमोजी वापरता येऊ शकते.

असे करा स्टिकर डाउनलोड –

चॅट की- बोर्ड ओपन केल्यावर तुम्हाला एक नवीन स्टीकर बटण दिसेल.
स्टिकर बटणवर क्लिक केल्यानंतर नवीन स्टिकर स्टोर सुरू होईल.
यामध्ये आवडते स्टीकर्स युजरमध्ये चॅटमध्ये वापरता येतील.

व्हॉट्सअ‍ॅपने यासाठी एक डेडिकेटेड स्टिकर कॅटेगरी ठेवली आहे. अॅपमधील उजव्या बाजूला असलेले + या चिन्हावर टॅप करा. तुम्हाला १२ स्टिकरचा पॅक मिळेल. तुम्ही आपल्या आवडीनुसार स्टिकर डाउनलोड करू शकता. त्यासाठी प्ले स्टोरमधून आणखी स्टिकर्स डाउनलोड करावी लागतील.

व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सला तु्म्ही वेब व्हर्जनवरदेखील वापरू शकता.  फेवरेटचा एक पर्यायही या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आवडीचे स्टीकर्स स्टार बटणावर क्लिक करून मार्क करू शकतो.

याशिवाय प्ले स्टोरवर जाऊन स्टीकर्सवाला थर्ड पार्टी पॅक डाऊनलोड करा. प्ले स्टोरवर ‘WAStickerApp’ वर उपलब्ध आहे जिथे अनेक स्टीकर पॅक डाऊनलोड करण्याचा पर्याय युजर्सना मिळणार आहे.