WhatsApp चॅट्स लीक होताहेत ? ‘या’ सोप्या पद्धती वापरून सुरक्षित रहा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या वाचल्या असतील. जर यापासून दूर रहायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरून थेट चॅट्सनाही तर अप्रत्यक्ष चॅट्स लीक होऊ शकतात आणि याविषयी तुम्हाला माहिती नसतं. एंड टु एंड व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स असतात. पंरतु कंपनीनं स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्याचे बॅकअप एंड टु एंड एन्क्रिप्टेड नसतात.

क्लाऊडवर चॅट बॅकअपला करा इग्नोर- iCloud आणि Gmail Drive वर व्हॉट्सअ‍ॅपचे चॅट बॅकअप असतात. आयफोन युजर्ससाठी iCloud तर अँड्रॉईडसाठी Gmail Drive वर चॅट बॅकअप जातो. बॅकअपसाठी चॅट्स एंड टु एंड एनक्रिप्टेड नसतात जे धोकादायक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटींगमध्ये जाऊन तुम्ही चॅट बॅकअप बंद करू शकता. अत्यावश्यक चॅटींगचा बॅकअप तुम्ही ईमेलवर एक्सोपर्ट करू शकता.

जर तुम्हाला चॅट्स बॅकअप क्लाऊडवर घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला क्लाऊड ड्राईव्हला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला एक स्ट्राँग पासवर्ड गरजेचा आहे. तसंच तुम्हाला टू फॅक्टर ऑथेंटीकेशन सुद्धा इनेबल करावं लागेल. हे जीमेलच्या पासवर्ड सेटींगमध्ये मिळेल.

जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप क्लाऊड स्पेसमधून डिलीट करायचा असेल तर हा सुद्धा आप्शन तुम्हाला आहे. यासाठी गुगल ड्राईव्हवर लॉगईन करा. व्हॉट्सअ‍ॅप फोल्डरवर जाऊन व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप फाईल तुम्ही डिलीट करू शकता.