त्याने तिला केले अश्लील ग्रुप मध्ये अॅड आणि आता खातोय जेलची हवा 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – सोशल नेटवर्किंग साईटसवर सर्वाधिक अश्लील व्हिडीओ, फोटो शेअर केले जातात. त्यातही व्हाट्स अॅपद्वारे अशा गोष्टी सर्वत्र पसरवल्या जातात. मुंबईतील एका व्यक्तीने पॉर्नोग्राफिक कन्टेन्ट शेअर होत असलेल्या व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये तिची परवानगी न घेता तिला अॅड केले त्यामुळे त्या ग्रुपच्या अॅडमिनला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने मुंबईच्या आयटी सेलकडे या ग्रुपबाबत तक्रार केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणार अॅडमिन मुश्ताक अली शेख (वय २४) हा ग्रुपचा अॅडमिन आहे. तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे पण कामाच्या शोधात तो मुंबईला आला होता. त्याने व्हाट्स अॅपवर त्याने ट्रिपल एक्स नावाचा एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये काही दिवसांपूर्वी त्याने एका महिलेला अॅड केले.  सुरुवातीला तिला ही बाब कोणीतरी मजा म्हणून करीत असेल असे वाटले मात्र नंतर तिला या घटनेचे गांभीर्य कळाले.  ग्रुपवरील अश्लील मेसेज पाहताच तिला खरा प्रकार लक्षात आला. तिने याबाबत पोलिसात तक्रार केली.

पोलिसांनी लगेच मुश्ताकला सायनहून अटक केली. मुश्ताकची चौकशी केली असता तो महिलेला जाणत नाही हे त्याने स्पष्ट केलं. तसंच हा नंबर त्याच्या नातेवाईकाचा आहे असा गैरसमज झाल्यामुळे त्याने हा नंबर ग्रुपमध्ये अॅड केला होता. याप्रकरणी पोलीस अजून तपास करत असून आयटी अॅक्ट अंतर्गत मुश्ताकला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.
व्हॉट्स अॅप वरील संदेशांविषयी काय घ्यायला काळजी 
–कोणत्याही पद्धतीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो शेअर करू नका
–शिवीगाळ असणारे संदेश शेअर करूया नका
–जर तुम्ही  अॅडमिन असाल तर असे संदेश पाठवणाऱ्यांना ग्रुपमधून काढून टाका
–चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांविषयी वेळीच तक्रार करा
–राजकीय ,सामाजिक, जातीविषयक भडकावणारे संदेश पाठवू अगर शेअर करू नये .