WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – WhatsApp बिझनेस अ‍ॅपवरून ऑनलाइन स्टेटस (Online status) हटवण्याचे काम सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट अँड्रॉईड बीटामध्ये (The latest Android beat) बिझनेस अकाऊंटवरून ऑनलाइन स्टेटस इंडिकेटर हटवण्यात आला आहे. रिपोर्टनुसार कंपनी व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसच्या (WhatsApp Business) पुढील व्हर्जनमधून ऑनलाइन स्टेटस इंडिकेटर हटवण्याच्या तयारीत आहे.

तुम्ही बिझनेस अकाऊंटद्वारे चॅट करत असाल आणि ऑनलाइन स्टेटस दिसत नाही असे होऊ शकते. WABetainfo च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, बिझनेस अकाऊंटवरून ऑनलाइन स्टेटस इंडिकेटर फिचर (Indicator feature) बंद केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे खरोखरच हैराण करणारे आहे, कारण ऑनलाइन स्टेटस फिचर खुप महत्वाचे आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप Businessचे अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.21.13.17 बाबत काही टेस्टर्सने म्हटले होते की, यामध्ये ऑनलाइन स्टेटस दिसत नाही. सुरुवातीला असे वाटले की, हा बग आहे, परंतु नंतर हे कन्फर्म करण्यात आले की, कंपनीने जाणीवपूर्वक हटवले आहे.

इतकेच नव्हे, रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाऊंटवरून ऑनलाइन स्टेटससह लास्ट सीन सुद्धा हटवले जात आहे. कारण ऑनलाइन स्टेटस आणि लास्ट सीन एकमेकांना कम्प्लीट करतात, यासाठी जर कंपनी ऑनलाइन स्टेटस इंडिकेटर हटवत असेल तर लास्ट सीन सुद्धा हटवू शकते.

व्हॉट्सअ‍ॅपकडून सध्या काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु सध्या अँड्रॉईडसाठी हे आहे. नंतर iOS साठी सुद्धा अपडेट केले जाऊ शकते. लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटस व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसवरून हटवल्यानंतर हे एक प्रकारच्या सिग्नलप्रमाणे आहे. सिग्नलमध्ये सुद्धा ऑनलाइन किंवा लास्ट सीन सारखे फिचर नाही.

सध्या नावाच्या खाली ऑनलाइन स्टेटस असते किंवा लास्ट सीन.
लास्ट सीन हाईड केल्यास काहीही दिसत नाही.
परंतु आता नेहमी नावाच्या खाली बिझनेस अकाऊंट लिहिलेले असेल.

Web Titel :- whatsapp new beta update online status and last seen missing business account know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक