WhatsApp Call मध्ये मोठा बदल ! जाणून घ्या कसं तुमच्यासाठी झालं काम सोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्सची मोठी समस्या दूर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने जवळपास चार वर्षांपूर्वी व्हाइस कॉलिंग सादर केला होते आता कंपनीने यात मोठा बदल करुन हे सादर केले आहे. कंपनीने कॉलिंगसाठी एक फीचर रोलआऊट केले आहे, ज्यामुळे युजर्सची एक मोठी समस्या सुटली आहे.

WhatsApp अ‍ॅण्ड्राइड यूजर्ससाठी एक नवे फिचर कॉल वेटिंग सादर केले आहे. व्हॉइस कॉलिंगबरोबर ही पहिल्यांदा मोठी अडचण येत होती. ज्यामुळे व्हॉइस कॉल सुरु असल्यास दुसऱ्या कोणी कॉल केल्यास तो वेंटिंगवर दिसत नव्हता. परंतू आता हे कॉल वेंटिंगवर असल्याचे दिसून येईल.

असे काम करेल कॉल वेटिंग फीचर –
उदाहरण म्हणून जेव्हा एखादा यूजर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर असेल तर दुसरा कोणी कॉल करण्याचा प्रयत्न करत असे तर कॉल वेटिंगवर दिसून येईल. यात ते कॉल वेटिंगवर येणाऱ्या कॉलला कट देखील करु शकतात किंवा चालू कॉल कट करुन दुसऱ्या कॉलवर बोलू शकतात. परंतू यात अजूनही कॉल सुरु असताना तो होल्डवर ठेवून दुसरा कॉल उचलता येत नाही.