खुशखबर ! कितीही जुने मेसेज शोधा फक्त एका मिनिटामध्ये, WhatsApp वर उपलब्ध होणार ‘हे’ फिचर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मेसेजिंग अ‍ॅप ‘व्हॉट्सअ‍ॅप’ (WhatsApp) गेल्या काही दिवसांपासून सतत नव-नवे फिचर्स आपल्या अ‍ॅपमध्ये जोडत आहे. आजच्या काळातील संवाद साधण्याचं सर्वोत्तम माध्यम म्हणून या अ‍ॅप कडे पाहिलं जातं. बऱ्याचवेळा आपणास जुन्या मेसेजचा संदर्भ हवा असतो तेव्हा तो मिळत नाही. त्यावेळी ते शोधणं अधिक कठीण होऊन बसतं. याकरिता कंपनीकडून खास फीचर्स लाँच करण्यात येणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच आपल्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहे. सध्या या फीचर्स वरती काम काम सुरु असून, सर्वात पहिल्यांदा हे फीचर्स आयफोन आणि त्यानंतर अँड्रॉइड फोनसाठी लाँच करण्यात येणार आहे. या फीचर्सच टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर वापरकर्त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

एका कॅलेंडर आयकॉनला Whatsapp सोबत जोडण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्याला हे अ‍ॅप वापरताना कॅलेंडर आयकॉन दिसेल. या कॅलेंडरच्या माध्यमातून तुम्ही कितीही जुने मेसेज अगदी काही क्षणात शोधू शकणार आहात. तुम्हांस फक्त तारीख निवडायची आहे. त्या तारखेस तुम्ही कोणाशी आणि काय बोललात याचे तपशील पाहता येणार आहेत. याबाबतचे वृत्त wabetainfo ने दिलं आहे.