WhatsApp वर व्हिडीओ पाठवून ‘हॅकर्स’कडून फोनवर ‘कंट्रोल’, तात्काळ App ‘अपडेट’ करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉट्सअ‍ॅपवर अनेक दिवसांपासून हॅकर्सची नजर आहे आणि याबाबतच्या धोक्याच्या बातम्या अनेकवेळा आलेल्या आहेत. नुकताच यावर पिगासूस स्पायवेअर अटॅकचा समावेश आहे. वॉट्सअ‍ॅपने स्वतः हॅकर्स युजर्सचा डेटा कंट्रोल करू शकतात याबाबतची कबुली दिलेली आहे. एवढेच नाही तर यामुळे फोनसुद्धा हॅक केला जाऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार हॅकर्स युजरला MP4 फॉरमॅटमध्ये व्हिडीओ फाईल पाठवून फोनला पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम करत आहेत. फेसबुक कडून मिळणाऱ्या माहितीनुसार समजते की, 2.19.274 च्या आधीच्या अँड्रॉइड व्हर्जनला धोका आहे. iOS मध्ये 2.19.100 या आधीच्या व्हर्जनला धोका आहे. विंडोज फोनमध्ये 2.18.368 या आधीच्या व्हर्जनला धोका आहे. अँड्रॉइड आणि iOS च्या बिजनेसअ‍ॅपच्या अनुक्रमाने 2.19.104 आणि 2.19.100 या व्हर्जनच्या आधीच्या सर्व व्हर्जनला धोका आहे.

यामध्ये हॅकर्स एक व्हिडीओ पाठवून युजर्सची फोन कंट्रोल करत आहेत. मात्र याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही की या व्हिडीओमुळे डेटा हॅक होत आहे. हॅकर्स केवळ फोन कंट्रोल करण्यासाठी हा व्हिडीओ पाठवत आहेत.

हॅकर्स पासून वाचण्यासाठी हे करा
हँकिंगचे सर्व प्रकार जुन्या व्हर्जनमध्ये होत असल्याने युजर्सने लवकरात लवकर आपले वॉट्सअ‍ॅप अपडेट करणे गरजेचे आहे. अँड्रॉइड युजर्सला प्ले स्टोअरवरून तर आयओएस युजर्सला अँपल स्टोअर वरून वॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Visit : Policenama.com