जेव्हा घोडागाडीत बसण्यासाठी ‘ढसा-ढसा’ रडत इटलीच्या रस्त्यावर लोळू लागला संजय दत्त !

बॉलिवूड स्टार संजय दत्त बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून ओखळला जातो. त्याचं आयुष्य कायमच ओपन पुस्तकासारखं राहिलं आहे. संजयच्या लहानपणीचा एक किस्सा असा आहे जो खूप कमी लोकांना माहिती आहे.

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा संजय दत्त 3 वर्षांचा होता. अनेक वर्षांपूर्वी त्यानं हा किस्सा एका मुलाखतीत ऐकवला होता. वडिल संजय दत्तनं हा किस्सा संजयला सांगितला होता. सुनील दत्त म्हणाले होते, आम्ही इटलीला गेलो होतो. एका इटालियन माणसासोबत माझी मीटींग होती. आम्ही एका कॉफी आउटलेटवर बसलो होतो. तेव्हाच संजयची नजर एका घोडोगाडीवर पडली. यानंतर तो हट्ट करू लागला की, घोडागाडीत बसायचं आहे.

सुनील दत्त पुढे म्हणाले होते की, मी आणि नरगिसनं नकार देत तिथं घोडागाडीत जाणं शक्य नसल्याचं सांगितलं. रागात येऊन संजय रस्त्यावर लोळू लागला. तेथील इटालियन लेडीज संजयला पहात होत्या. त्या म्हणाल्या अरे देवा किती निर्दयी पालक आहेत. मुलाला रडवत आहेत. त्यांना मुलाची काळजी नाही. हे ऐकल्यावर माझी बायको नरिगसला खूप लाजल्यासारखं वाटलं. यानंतर मीटींग सुरू असलेल्या माणसाला हे सगळं कळालं तेव्हा त्यानं आमची मीटींगचं घोडागाडीत घेतली.