White Hair Problem Solution | कमी वयात डोक्याचे केस का होतात पांढरे? जाणून घ्या कसा करावा बचाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – White Hair Problem Solution | 25 ते 30 वर्षांच्या तरुणाने डोक्यावर पांढरा केस पहिल्यांदा पाहिला तर तर टेन्शन (Tension) येणारच. इतक्या लहान वयात असे का होतेय असा विचार मनात येतो. काही वेळा यामागे अनुवांशिक कारणे असू शकतात, जी टाळणे जवळपास अशक्य असते, परंतु अनेकदा आपल्या जीवनशैलीतील (Lifestyle) काही चुका यास जबाबदार असतात. अकाली केस पांढरे होण्याची कोणती कारणे असू शकतात आणि ते टाळणे कसे शक्य आहे ते जाणून घेऊया (White Hair Problem Solution).

 

लहान वयात केस पांढरे होण्याची कारणे

अनहेल्दी डाएट (Unhealthy Diet)
अनावश्यक टेन्शन
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता
केमिकल्सयुक्त हेअर प्रॉडक्टचा वापर
दारू आणि सिगारेटचे सेवन
अनुवांशिक कारणे

 

केस पिकण्यापासून कसे वाचवायचे?

1. शॅम्पूचा रोज वापर टाळा
जर तुम्ही रोज शॅम्पू (Shampoo) वापरत असाल तर आजपासून ते बंद करा. त्याऐवजी, माईल्ड आणि ऑर्गेनिक (Mild, Organic) शॅम्पू वापरा. सहसा शॅम्पू आणि कंडिशनरमध्ये (Conditioner) केमिकल असतात ज्यामुळे पिगमेंट प्रॉडक्शनवर परिणाम होतो आणि केस पांढरे होतात. (White Hair Problem Solution)

 

2. हेल्दी फूड खा (Healthy Food)
तेलकट, फास्ट आणि जंक फूड (Oily, Fast, Junk Food) जास्त खाल्ले तर केसांना अंतर्गत पोषण मिळत नाही आणि लहान वयातच केस पांढरे व्हायला लागतात हे उघड आहे. अशावेळी व्हिटॅमिन बी-12 (Vitamin B-12) असलेली फळे आणि हिरव्या पालेभाज्या अधिक प्रमाणात खाणे आवश्यक आहे.

3. केमिकलयुक्त हेअर ऑइल टाळा (Chemical-Laden Hair Oil)
आजकाल बाजारात अशी केसांची तेले मिळतात ज्यात केमिकल असते, कधी कधी आपण केसांना सुगंधी तेल लावतो, ज्यामुळे पोषण मिळत नाही, त्याऐवजी बदाम, नारळ, ऑलिव्ह तेल (Almond, Coconut, Olive Oil) डोक्याला लावा.

 

4. सिगारेट आणि दारूपासून दूर राहा (Cigarette, Alcohol)
सिगारेट आणि अल्कोहोलमुळे आपली फुफ्फुसे आणि लिव्हर तर खराब होतेच पण ते केसांचे शत्रू देखील आहे, त्यामुळे केस लवकर पांढरे आणि कमकुवत होतात. या वाईट सवयी लवकर सोडा.

 

5. अनावश्यक ताण घेऊ नका
केस पांढरे होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे अनावश्यक ताणतणाव, (stress) अनेकवेळा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते, पण त्याचा पुन्हा पुन्हा विचार करून आपण तणाव वाढवतो. आनंदी राहिल्यास केसांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- White Hair Problem Solution | white hair problem reason behind it chemical shampoo smoking drinking stress depression

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vinayak Mete Death | विनायक मेटे अपघात प्रकरणाला नवे वळण, 2 गाड्यांनी पाठलाग केला होता

 

Pune Crime | सिगारेट, पाण्याच्या बाटलीवरुन दोन गटात राडा; लोखंडी कात्री, दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

 

Pune Rain | वरसगाव धरणही १०० टक्के भरले; पुणे जिल्ह्यातील १० धरणे १०० टक्के फुल्ल, खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेक विसर्ग