आई निवेदिका – पत्नी शिक्षिका, असं आहे नवे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचा परिवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत आज सेवानिवृत्त झाले आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. ते अजूनही सेनाप्रमुखपदाचे पद सांभाळत होते. जनरल मनोज नरवणे हे देशाचे २८ वे लष्करप्रमुख आहेत. आमच्या नवीन लष्कर प्रमुखांनी कोठून अभ्यास केला आहे आणि त्याचे कुटुंब कसे आहे हे पाहूयात.

जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचा जन्म २२ एप्रिल १९६० ला मराठी परिवारामध्ये झाला. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात अधिकारी होते. त्यांनी विंग कमांडर पदावरून निवृत्ती घेतली होती. नवीन लष्कर प्रमुखची आई अखिल भारतीय रेडिओमध्ये अनाउंसर होती आणि त्यांची पत्नी पेशाने शिक्षिका आहे. अध्यापनाचा त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे. मनोज मुकुंद नरवणे हे दोन मुलींचे वडील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सदाशिव पेठ येथे ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे.

शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी NDA ची तयारी केली आणि पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश घेतला. याशिवाय त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनकडून प्रशिक्षण घेतले. नवे लष्कर प्रमुख, मद्रास विद्यापीठातून संरक्षण अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर, देवी अहिल्या विद्यापीठ इंदौरमध्ये संरक्षण व व्यवस्थापन अभ्यास या विषयात एमफिल केले. त्यांनी डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन आणि आर्मी वॉर कॉलेज Mhow येथे प्रशिक्षण घेतले.

लष्करप्रमुख बनताच मनोज मुकुंद नरवणे हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यात समाविष्ट असलेल्या १३ लाख सैन्य दलाचे प्रमुख झाले आहेत. सेना उपाध्यक्ष होण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल नरवणे हे पूर्व कमांडचे प्रमुख होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like