निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी घेतला ‘या’ महिलेचा आशिर्वाद

वाराणसी : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदार संघातून आज (शुक्रवारी) आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. वाराणसीत भव्य रोड शो करण्यात आला. या रोड शो ला जनतेने मोठा प्रतिसाद दिला. पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या आईला प्रेरणास्थान मानतात हे तर सर्वांना माहीतच आहे. पण आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी मदन मोहन मालविया यांच्या मानस कन्या अन्नपूर्णा शुक्ला यांना वाकून नमस्कार केला, त्यांचे आशिर्वाद घेतले.

कोण आहेत अन्नपूर्णा शुक्ला

अन्नपूर्णा शुक्ला या बनारस महिला विश्वविद्यालयाच्या (बीएचयु) प्राचार्य होत्या. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण बनारस विद्यापीठातूनच पूर्ण केले आहे. अन्नपूर्णा देवी या मालवीय यांचे आशीर्वाद मिळलेल्या एकमेव जिवंत माजी प्राचार्य आहेत. त्यामुळेच त्यांना मालविय यांच्या मानस पुत्री मानले जाते. या वयातही अन्नपूर्णा शुक्ला आपल्या सामाजिक कार्यात सहभागी होतात. लहुराबीर येथील काशी अनाथालय संस्था वनिता पॉलिटेक्निकच्या त्या निर्देशिका आहेत. त्यांनी १९२१ साली महाविद्यालयात गृहविज्ञान शिक्षणाची सुरुवात केली होती. त्या गृहविज्ञान विभागाच्या पहिल्या विभागप्रमुख होत्या.

अर्ज भरल्यानंतर काय म्हणाले मोदी ?

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, ‘मी काशीच्या लोकांचा आभारी आहे. ५ वर्षानंतर काशीच्या लोकांनी पुन्हा एकदा मला आशीर्वाद दिला आहे. बाबांची नगरी, गंगेचा आशीर्वाद घेत पुन्हा एकदा विकासाचा संकल्प घेतला आहे. लोकांनी मतदान करावं.’ पंतप्रधान मोदींनी यावेळी मीडियाचे देखील आभार मानले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like