धक्कादायक ! जगात ‘धुम्रपान’ करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा पोरींची संख्या अधिक, ‘WHO’ चा अहवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच जागतिक आरोग्य संघटनेचा (World Health Organization) ताजा रिपोर्ट समोर आला आहे ज्यात धक्कादायक खुलासा झाला आहे. जगभरात धुम्रपान करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे. धुम्रपान आरोग्यास हानकारक असतानाही यात महिलांनी आघाडी घेतली आहे.

इतिहासात पहिल्यांदाच स्मोकिंगमध्ये महिला पुढे
WHOचे महासंचालक टेड्रोस ग्रेब्रियासिस म्हणाले, “गेल्या काही दशकात स्मोकिंग करण्यात पुरुष पुढे होते. परंतु ही पहिलीच वेळ आहे की महिला पुरुषांपेक्षा जास्त स्मोकिंग करत आहेत. भारतात ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS) मध्ये सतत हे सांगितलं जात आहे की, स्मोकिंगच्या बाबतीत महिला पुरुषांच्या खूप जवळ आहेत. याबाबतीत महिलांची संख्या आधीपासूनच पुरुषांपेक्षा जास्त आहेत.

स्मोकिंग किंवा तंबाखू उत्पादनांच्या वापरामुळे कॅन्सर आणि इतर गंभीर आजार होतात
विविध शोधातून असं समोर आलं आहे की, स्मोकिंग किंवा तंबाखू उत्पादनांच्या वापरामुळे कॅन्सरसारखा घातक आजार होतो. अशा उत्पादनांच्या वापरामुळे हृदयाचे आजार, हार्ट अ‍ॅटॅक आणि इतर संसर्गजन्य रोग होतात.

तंबाखूच्या वापरानं 80 लाख लोकांचा मृत्यू
WHOचं म्हणणं आहे की, जगभरात स्मोकिंग आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनानं सुमारे 80 लोकांचा मृत्यू होतो. याशिवाय सुमारे 12 लाख लोक केवळ पॅसिव्ह स्मोकिंगमुळे मरतात. हे ते लोक आहेत जे स्मोकिंग करणाऱ्या लोकांमुळे प्रभावित होतात. जे स्मोकिंग करणाऱ्यांच्या आजूबाजूला असतात. ते प्रत्यक्षपणे स्मोकिंग करत नसले तरी अप्रत्यक्षपणे स्मोकिंग करतात.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/