‘कोरोना’च्या 6 वॅक्सीन तिसर्‍या फेजमध्ये, परंतु यश मिळण्याची सध्या नाही ‘गॅरंटी’ : WHO

वॉशिंग्टन : वृत्त संस्था  – कोरोना व्हायरसने जगभरात कहर माजवला आहे. आतापर्यंत या भयंकर व्हायरसने 7 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे, तर संपूर्ण जगात 1 कोटी 80 लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. अशा स्थितीत प्रत्येकाची लक्ष कोरोना वॅक्सीनकडे लागले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जगभरात सहा वॅक्सीनचे काम तिसर्‍या फेजमध्ये पोहचले आहे. परंतु, डब्ल्यूएचओचे देखील म्हणणे आहे की, या सर्व वॅक्सीन यशस्वी होती, याची कोणतीही खात्री नाही.

सध्या जगात कुठे कुठे आणि किती वॅक्सीनवर काम सुरू आहे ते जाणून घेवूयात…

1 डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, सध्या जगात 6 वॅक्सीनची तिसर्‍या तीसर्‍या फेजची ट्रायल सुरू आहे. यामध्ये 3 वॅक्सीन चीनच्या आहेत.

2 जगभरात सध्या 165 वॅक्सीनवर काम सुरू आहे. ज्यांचे वेगवेगळ्या फेजच्या ट्रायल सुरू आहेत. सध्या 26 वॅक्सीन अशा आहेत, ज्यांच्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत.

3 फेज तीनमध्ये मोठ्या संख्येने लोकांवर ट्रायल केली जात आहे. ही वॅक्सीन मोठ्या कालावधीपर्यंत जास्तीत जास्त लोकांवर काम करत आहे किंवा नाही, याचा शोध घेतला जात आहे. सध्या याची खात्री नाही की, तिसर्‍या फेजमध्ये सर्व वॅक्सीन यशस्वी होतील.

4 चीनमध्ये ज्या तीन वॅक्सीनचे काम तिसर्‍या टप्प्यात पोहचले आहे, त्या आहेत – सिनोवॅक, वुहान इन्स्टीट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट, सिनोफॅरम/बीजिंग इन्स्टीट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट.

5 अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने कोरोना वॅक्सीनवर सर्वात अगोदर काम सुरू केले. आतापर्यंतच्या रिपोर्टनुसार पहिल्या दाने फेजच्या क्लिनिकल ट्रायलमधून चांगले परिणाम समोर आले आहे. या वॅक्सीनचा अवघड आणि तिसरा टप्पा 27 जुलैपासून सुरू झाला आहे.

6 ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वॅक्सीनकडून संपूर्ण जगाला सर्वात जास्त आशा आहे. तिची क्लिनिकल ट्रायल विविध देशांत सुरू आहे. भारताचे सीरम इन्स्टीट्यूट सुद्धा ऑक्सफर्डच्या या प्रोजेक्टमध्ये पार्टनर आहे.

7 भारताच्या दोन वॅक्सीन – भारत बायोटेक आणि जायडस कॅडिलाने ह्यूमन ट्रायल सुरू केली आहे. भारत बायोटेक कंपनीने इससे प्रथम पोलियो, रेबीज, चिकनगुनिया, जपानी इनसेफ्लाइटिस, रोटा व्हायरस आणि झीका व्हायरससाठी सुद्धा वॅक्सीन बनवली आहे.