MS धोनीला ‘करारा’तून वगळलं, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयने गुरुवारी जाहीर केलेल्या आपल्या वार्षिक करारातून भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला वगळल्याने धोनीचे चाहते नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी यावर अनोखी प्रतिक्रिया दिली.

बीसीसीआयने धोनीला करारातून वगळल्याने धोनीच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा जोर धरु लागली. चाहत्यांकडून बीसीसीआयला प्रश्न विचारण्यात आला की हा धोनी पर्वाचा अंत समजावा का? बीसीसीआयच्या या कराराचा नक्की अर्थ काय? हे आणि असे बरेच काही.

धोनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. तो सैन्य दलाच्या सेवेतही रुजू झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या धोनीला करारातून वगळण्यात आले. परंतु धोनीने फक्त एकच गोष्ट केली तर बीसीसीआय त्याला पुन्हा करारात सहभागी करुन घेऊ शकते.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या हा करार सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी आहे. धोनीने सप्टेंबर 2019 पासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. परंतू तो टी-20 विश्वचषकात खेळू शकतो. हा विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात आहे. त्यामुळे बीसीसीआयला नवा करार करावा लागणार आहे. धोनी आगामी करारात असू शकतो.

बीसीसीआयच्या करारातून धोनीला वगळण्यामागचे कारण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींना विचारले असता ते म्हणाले की, “धोनीला बीसीसीआयच्या करारातून का वगळले याबाबत मला कोणतेही भाष्य करायचे नाही.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/