ठाकरे सरकारमध्ये सर्वात ‘पॉवरफुल्ल’ कोण याबद्दल शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे सरकार आले. सरकार स्थापन झाले असले तरी सध्या या सरकारचा रिमोट माझ्या हातात आहे अशी चर्चा आहे. मात्र, तसे काही नाही. जो मुख्यमंत्री पदाच्या जागेवर बसतो तो पक्का होतो. मागे आम्ही तिघेही केवळ शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा व त्यांच्या घामाचे मोल त्याला मिळावे यासाठी एकत्र आलो असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

चोपडा येथे पवार यांच्या उपस्थितीत आज चोपडा सुतगिरणीच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या हातात सरकारचे रिमोट असल्याचे बोलणाऱ्यांना उत्तर दिले. सरकार स्थापन झाल्यानंतर आघाडी सरकारचे रिमोट शरद पवार यांच्या हातात असल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्याला शरद पवारांनी उत्तर दिले.

शरद पवार म्हणाले, आज देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे. सर्वत्र मंदी आहे. जनतेने नरेंद्र मोदी यांच्याकडे देश चालवायला दिला आहे. मात्र, देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाही की शेतमालाला भाव मिळत नाही. मोदी हे राजकारणात मोठे भारी आहेत. बारामतीत येऊन ते म्हणतात मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो तर दुसरीकडे वेगळेच बोलतात, असे सांगत मोदी राजकारणात भारी आहेत असे नमूद केले.