‘खिलाडी’ अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ सिनेमातून नीना गुप्ताला का हटवलं ? अभिनेत्रीनं केला ‘खुलासा’

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री नीना गुप्तानं अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांच्या सूर्यवंशी सिनेमाबद्दल मोठा खुलासा केला आहे. जेव्हा अक्षयचचा सिनेमा तयार होत होता तेव्हा नीनाला अक्षयच्या आईच्या रोलसाठी निवडण्यात आलं होतं. परंतु काही गोष्टी पुढे न गेल्यानं तिला सिनेमातून काढण्यात आलं. नीना गुप्तानं याबाबत भाष्य केलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना नीना गुप्ता म्हणाली, “मला सिनेमासाठी रोहित शेट्टीनं नकार दिला नव्हता तर सिनेमाच्या प्रॉडक्शन असिस्टंटनं याबाबत मला माहिती दिली होती. मला त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की, हा ट्रॅक सिनेमात सूट होत नाहीये त्यामुळं ते मला काढत आहेत.”

पुढे बोलताना नीना गुप्ता म्हणते, “या सगळ्या बद्दल माझं रोहित शेट्टीसोबत काहीच बोलणं झालं नव्हतं. यात बातचित करण्यासारखं असं काहीच नव्हतं. उलट हे चांगलं झालं की, त्यांनी शुटींगच्या नंतर काढण्यापेक्षा आधीच मला काढून टाकलं. कधी कधी असंही होतं की, सिनेमात काही रोलची गरज नसते. जर नेक्स्ट टाईम ते एखादा सिनेमा बनवत असतील तर मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना रोल मागेन.”

नीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपर्वीच तिनं शुभमंगल ज्यादा सावधान आणि पंगा सिनेमात काम केलं आहे.