टक्कल्या व्यक्तीनं ‘विग’ लावून केलं लग्न, सत्य समोर आल्यानंतर वधूनं केला FIR दाखल

नवी दिल्ली – टक्कल पडणे हा एक असा आजार आहे ज्याचा विचार करून लोक तणावग्रस्त होतात. हे सहसा चित्रपटांमध्ये पाहिले जाते की टक्कल पडलेल्या लोकांना लग्नात अडचण येते. अशा परिस्थितीत ते काही जुगाड लावुन आपल्या टक्कल पडण्यावर उपचार करतात. काही यात यशस्वी होतात तर काही अपयशी ठरतात. असाच एक तरुण मुंबईत आहे. ही 27 वर्षांची व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्याच्यावर त्याच्या पत्नीने एक विचित्र केस दाखल केली आहे. तिच्या मते तिचा नवरा टक्कला आहे. तो विग घालतो. त्याने लग्नापूर्वीच हे तिच्यापासून लपवून ठेवले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, हा व्यक्ती मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करतो. त्याच्या पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्याने स्वत:च्या जामिनासाठी कोर्टात अर्ज केला पण कोर्टाने त्याला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत सांगितले की लग्नानंतर तिला पतीला टक्कल पडल्याचे समजले. ही माहिती मिळताच तिला धक्का बसला. तिचे म्हणणे आहे की लग्नाआधी तिच्या नवऱ्याने ही गोष्ट तिच्यापासून लपविली होती. दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे. त्याचबरोबर पत्नीने तक्रारीत असेही म्हटले आहे की लग्नाआधी जर तिला याबद्दल माहिती असते तर तिने लग्न केले नसते.

बायकोने असं म्हटलं आहे की तिच्या सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आले आहे की ही मोठी गोष्ट नाही. मात्र, महिलेने आपल्या पतीविरूद्ध फसवणूक आणि मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.