अनैतिक संबंधातून पत्नीचा खून; पतीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

विवाहबाह्य संबंधातून पतीने आपल्या पत्नीचा चाकूने भोसकून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईतील अंधेरी पूर्व भागात मंगळवारी रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंधेरी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

[amazon_link asins=’B01HQ4NZE0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69bb7097-8fbe-11e8-b51d-2b244719716d’]

आरोपी आणि मयत महिलेचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महिला लग्नापूर्वीच गर्भवती राहिल्यामुळे घरच्यांनी आठ महिन्यांपूर्वी दोघांचा विवाह लावून दिला. लग्नानंतर महिलेने एका मुलीला जन्म दिला. पतीचे आणखी एका स्त्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचे तिला समजले. यावरुन दोघांमध्ये सतत भांडण होत असल्याचे महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले.

पतीने मंगळवारी अंधेरीतील वर्दळ नसलेल्या भागात पत्नीला नेले आणि तिच्यावर चाकूने वार केले व तो पळून गेला. रस्त्यावर पडलेला महिलेचा मृतदेह पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. अंधेरी पोलिसांनी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.