चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्यावर संशय घेत दररोज पती पत्नीचे भांडण होत असताना काल या भांडणाचा शेवट झाला. पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घाटसावळी तांडा येथे घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने देखील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौळणबाई र्जुन मिटकर (40) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अर्जुन महादेव मिटकर (44) असे खुन करणाऱ्याचे नाव आहे.

यासंदर्भात मुलका विकास अर्जुन मिटकर याने पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे आई आणि वडील यांच्यात काही महिन्यांपासून सतत भांडणे होत होती. आईच्या चारित्र्यावर संशय घेत भांडणाला सुरुवात होत असे. काल गणपती विसर्जन असल्यामुळे मी मिरवणुकीमध्ये होतो. रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे भांडणे सुरू झाले. परंतु मिरवणूकीतील स्पीकर चा आवाज व घोषणांच्या आवाजामुळे लोकांना भांडणाची चाहूल लागली नाही. रात्री मिरवणूक संपल्यानंतर मी घरी गेलो तेव्हा माझी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्रांचे वार करण्यात आले होते. त्याच वेळी बाजूला वडील देखील पडलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे मी पिंपळनेर पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच एपीआय भुतेकर, पीएसआय काळे, पीएसआय झिंजुर्डे, पोलीस हेडकॉन्स्टेबल खरमाटे, पोलीस कर्मचारी शेख, आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला व विषारी औषध प्रशासन केलेले अर्जुन मिटकर यांना देखील बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मुलाच्या फिर्यादी नंतर मयताच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावरील उपचार होताच पोलिस त्याला ताब्यात घेणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –