2 रूपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं पेट्रोल ! कच्च्या तेलाच्या किमतीत झाली 6% घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटात महागाईने सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. परंतु, आता यामध्ये थोडा दिलासा मिळण्याची शक्यता दिसत आहे. कारण अंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत आणि रूपया मजबूत होऊ लागला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एसकॉर्ट सिक्युरिटीचे आसिफ इकबाल यांनी न्यूज 18 हिंदीसोबत बोलताना सांगितले की, कच्चे तेल स्वस्त झाल्याने ऑईल मार्केटिंग कंपन्यांना दिलासा मिळेल. कारण भारत आपल्या गरजेपैकी 82 टक्के कच्चे तेल परदेशातून खरेदी करतो.

मागील काही महिन्यांपासून पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत. तेल कंपन्यांवर दरात कपात करण्यासाठी दबाव आहे. जर ब्रेंट क्रूडकडून कंपन्यांना दिलासा मिळाला तर कंपन्या ग्राहकांना दिलासा देऊ शकतात. जर क्रूडमध्ये 20 टक्केचा दिलासा मिळाल तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये 5 टक्के घट केली जाऊ शकते. यामुळे पेट्रोल आणि डिझेल 2.5 ते 3 रुपये प्रति लीटर स्वस्त होऊ शकते.

6 टक्के घसरू शकते कच्चे तेल
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात 6 टक्केपेक्षा जास्त घसरण झाली आहे. या घसरणीच्या पाठीमागे कच्च्या तेलाच्या मागणीत आलेली कमतरता आहे. कारण कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत असताना बिझनेसच्या हालचाली मंदावल्या आहेत. यासाठी मागणी कमी होत आहे. तर, वॅक्सीनबाबत सुद्धा अपेक्षांना झटका बसला आहे. या कारणामुळे अनेक कंपन्यांनी डिस्काऊंट देण्यास सुरूचात केली आहे. यामुळे यापुढे सुद्धा क्रूडमध्ये आणखी घसरण होऊ शकते. ऑक्टोबरपर्यंत क्रूडचे दर घसरून 32 डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावर येऊ शकतात.

एस अँड पीच्या रिपोर्टनुसार, प्रमुख कंझ्युमर देश चीनमध्ये जूनच्या दरम्यान क्रूडचे इम्पोर्ट 12.99 मिलियन बॅरल प्रति दिनच्या विक्रमी स्तरावर पोहचले होते. क्रूड इम्पोर्ट मार्चमध्ये 9.72 मिलियन प्रति बॅरल होते. आता हे घसरून 12.13 मिलियन प्रति बॅरलवर आले आहे. रॉयटर्सनुसार चीनचे क्रूड इम्पोर्ट घसरून 11.18 मिलियन प्रति बॅरल राहिले आहे.

भारतात घसरलेली पेट्रोल आणि डिझेलची मागणी पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम योजना आणि विश्लेषण प्रकोष्ठ (पीपीएसी) च्या आकड्यांनुसार ऑगस्टमध्ये उत्पादनाची विक्री मागच्या महिन्याच्या तुलनेत 7.5 टक्के घसरून 1.43 कोटी टन रााहिली आहे. एक वर्षापूर्वी ऑगस्टच्या तुलनेत विक्रीमध्ये 16 टक्के घसरण झाली आहे. वर्षाच्या दरम्यान ऑगस्ट लागोपाठ सहावा महिना आहे, ज्यामध्ये पेट्रोलियम उत्पादनांच्या व्रिकीमध्ये एक वर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे.

जुलैपासून लागोपाठ कमी होत असलेली पेट्रोल-डिझेलची मागणी एप्रिल 2020मध्ये रेकॉर्ड 48.6 टक्के घसरणीसह 94 लाख टन झाली होती. त्यावेळी सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लावला होता. त्यानंतर दोन महिन्यांमध्ये इंधनाची मागणी थोडी सुधारली. परंतु, जुलैपासून मासिक आधारावर मागणी लागोपाठ घसरत आहे.

देशात सर्वात जास्त विकले जाणारे इंधन डिझेलची विक्री ऑगस्टमध्ये 12 टक्के घसरून 48.4 लाख टन झाली आहे, जी जुलैमध्ये 55.1 लाख टन होती. वार्षिक आधारावर डिझेलच्या विक्री 20.7 टक्केची घसरण झाली. अशाप्रकारे ऑगस्टमध्ये पेट्रोलची विक्री वार्षिक आधारावर 7.4 टक्के घसरून 23.8 लाख टन झाली आहे. मात्र, जुलैच्या तुलनेत यामध्ये 5.3 टक्के वाढ नोंदली गेली आहे. जुलैमध्ये 22.6 लाख टन पेट्रोलची विक्री झाली होती.

एलपीजी-रॉकेलची सुद्धा कमी विक्री
ऑगस्टमध्ये एलपीजी विक्री वार्षिक आधारावर पाच टक्के घसरून 22 लाख टन राहिली. तर रॉकेलची मागणी 43 टक्के कमी होऊन 1,32,000 टन राहिली. मासिक- दर- मासिक आधारावर यांची विक्री जवळपास स्थिर होती.