Winter Diet : शरीराला आतून उबदार ठेवतात ‘या’ 5 गोष्टी, हिवाळ्यात असतात उपयुक्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हिवाळ्यात फक्त उबदार कपडे थंडी टाळण्यासाठी पुरेसे नसतात. या हंगामात आपण आपल्या आहारात अशा गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत, ज्यामुळे शरीर आतून उबदार राहील. येथे आम्ही तुम्हाला खाण्यापिण्याच्या अशाच काही गोष्टी सांगत आहोत, ज्या शरीरात उबदारपणा आणण्याबरोबरच प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.

ड्रायफ्रूटस –  बदाम, अंजीर यांच्यासह काही ड्रायफ्रूटस शरीराला उबदारपणा देतात, म्हणून हिवाळ्यामध्ये ते खायलाच हवे. याशिवाय दुधात खजूर घालून खजूरही खाऊ शकता. खजूर आणि अंजीरमध्ये कॅल्शियम आणि लोह समृद्ध आहे जे शरीराला नैसर्गिक मार्गाने उबदार ठेवते. याशिवाय ते ऊर्जाही वाढवतात.

तूप –  तुपात आयुर्वेदिक गुणधर्म असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. शुद्ध तुपात चरबी असते जे शरीर उबदार आणि निरोगी ठेवते. एवढेच नाही तर तूप हिवाळ्याच्या हंगामात होणारा आळशीपणादेखील दूर करते.

मूळ भाज्या-  गाजर, मुळा, बटाटा, कांदा आणि लसूण या मूळ भाज्या उबदार असतात. या भाज्या शरीरात हळूहळू पचतात, ज्यामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यासाठी या भाज्या शक्य तितक्या आपल्या आहारात समाविष्ट करा. या भाज्या शरीराला निरोगी ठेवतात आणि प्रतिकारशक्तीदेखील वाढवतात.

मध-  हिवाळ्यात गोड गोष्टींमध्ये साखरेऐवजी मध वापरा. मध शरीरात खूप उष्णता आणते. हे कोशिंबीरवर टाकून खाल्ले जाऊ शकते. मधुमेह रुग्णांनी मध वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

गरम मसाले –  स्वयंपाक करताना लवंग, दालचिनी, आलेसारख्या गरम मसाल्याचा वापर करा. या गोष्टींमुळे केवळ अन्नाची चवच वाढणार नाही, तर शरीर उबदारही राहील. आपण हे मसाले चहा, कॉफी किंवा सूपमध्येदेखील घेऊ शकता.

You might also like