Winter Health Tips | ‘या’ 7 फूडचा करा डाएटमध्ये समावेश, इम्युनिटी होईल स्ट्राँग; आजारी पडणार नाही तुम्ही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Health Tips | आपले शरीर अशा संघटित प्रणालीने बनलेले आहे जे आवश्यकतेनुसार स्वतःला बरे करू शकते. मात्र, यासाठी पोषक आणि इतर आवश्यक कंपोनंटच्या स्वरूपात एनर्जी आवश्यक असते. व्हिटॅमिन, प्रोटीन आणि मिनरल्स समृध्द निरोगी अन्न सेवन करूनच हे साध्य करता येते. आपल्या शरीराची इम्युनिटी एक महत्वाची भूमिका बजावते, कारण ती हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसविरुद्ध ढाल म्हणून काम करते. यामुळे गंभीर आजारी पडण्याची शक्यता कमी होते. इम्युनिटी मजबूत करण्यासाठी चांगले अन्न खावे. असे ६ पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही इम्युनिटी वाढवू शकता. (Winter Health Tips)

 

१. आले आणि लसूण (Ginger And Garlic)
आल्यामध्ये आढळणारे शक्तिशाली अँटी-इंप्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट कंपाउंड इम्युनिटी वाढवण्यासाठी ओळखले जातात. लसणात आढळणारे एलिसिन नावाचे कंपाउंड सर्दी होण्याची शक्यता कमी करते. तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि मोठ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी दररोज एक कप आले लसूणचा गरम चहा घ्या. (Winter Health Tips)

 

२. मांस आणि मासे (Meat And Fish)
मांसामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते आणि ते तुमची इम्युनिटी सुधारतानाच शरीरातील स्नायू तयार करण्यास देखील मदत करते. चिकनच्या प्रोटीनमध्ये आढळणारे काही अमीनो अ‍ॅसिड रोगाशी लढणारे अँटिबॉडीज तयार करण्यास मदत करतात. झिंकने समृद्ध ऑयस्टर आणि खेकड्या सारखे शेलफिश तुम्हाला निरोगी ठेवतील.

३. हिरव्या पालेभाज्या (Green Leafy Vegetables)
पालक, कोबी आणि ब्रोकोलीसारख्या पालेभाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन (ए, सी आणि ई सह), खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे पोषक घटक इम्युनिटी मजबूत करतात. हिरव्या भाज्या एक बायोएक्टिव्ह पदार्थ देतात, ज्यामुळे आतड्यांची इम्युनिटी वाढते.

 

४. सुकामेवा (Dry Fruits)
बदाम, अक्रोड आणि काजू हे व्हिटॅमिन ईचे चांगले स्त्रोत आहेत आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स देखील आहेत,
जे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात. त्यांच्या सेवनाने इम्युनिटी मजबूत होते.
याव्यतिरिक्त, त्यात भरपूर प्रोटीन आणि फॅट असते, जे दीर्घ काळासाठी एनर्जी लेव्हल हाय ठेवते.

 

५. आंबट फळे
आंबट फळे जसे की द्राक्ष आणि संत्री हे व्हिटॅमिन सीचे उत्कृष्ट स्रोत आहेत, जे सर्दी आणि खोकल्याच्या लक्षणांचा कालावधी कमी करतात.
दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी या इम्युनिटी वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Winter Health Tips | winter health tips add these 6 foods in your diet to boost immunity so you will not get sick

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | स्वत:च्या अंगावर शाई ओतून पुण्यात अनोखं आंदोलन; कारण ठरले चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी

Pune Crime |  पुण्यातील धक्कादायक प्रकार! नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार