Lip Care Tips : जर ओठ फुटले, तर लावा ‘या’ 3 नॅचरल वस्तू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   थंड हवामानामुळे ओठांचे सौंदर्य खराब होते. फाटलेले आणि कोरडे ओठ ही समस्या थंड हवेत सामान्य समजली जाते. कारण ओठांची त्वचा अन्य त्वचेपेक्षा जास्त संवेदनशील असते. यामुळे थंड हवा ओठांमधील ओलावा कमी करते. अशा हवामानात ओठ निरोगी आणि मुलायम ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स…

या नॅचरल वस्तूंचा करा वापर

1 खोबरेल तेल

कोकोनट ऑई किंवा खोबरेल फाटलेल्या ओठांची समस्यां दूर करतो. हे हीलिंग प्रॉपर्टीजसह एक चांगले मॉश्चरायझर सुद्धा आहे. यासाठी हे तेल ओठांना निरोगी आणि नरम बनवते.

2 ऑर्गन ऑईल

फाटलेल्या ओठांना ऑर्गन ऑईल लावा. यामध्ये अनसॅचुरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स असतात आणि व्हिटामिन ई सुद्धा. यामुळे त्वचा नरम होते. नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. ऑर्गन ऑईल त्वचेची चमकसुद्धा वाढवते. त्वचेत ते सहज शोषले जाते. यामुळे स्कीन टेक्स्चर चांगले होते.

3 गावठी तूप

घरात तयार केलेले गावठी तूप सुद्धा ओठांसाठी अतिशय उत्तम मॉश्चरायझर आहे. हे ओठांना लावून ठेवा, आणि काही वेळाने टिश्यू पेपरने किंवा ओल्या कॉटनच्या कपड्याने ओट स्वच्छ करा.