हडपसर परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

हडपसर परिसरात घऱफोडी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी आणि पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीकडून ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून गुन्ह्यातील २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही घटना २९ जुलै रोजी पहाटे मांजरी येथे घडली.

प्रदीप विजय जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा एक साथिदार पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
[amazon_link asins=’B077PWMH85′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’658bac6d-9961-11e8-b6d8-bdeb4ca1d21b’]
आरोपी प्रदीप जाधव व त्याचा साथिदार मांजरी परिसरात घरफोडी करत होते. त्यावेळी नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जात असताना नागरिकांनी आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी प्रदीप जाधव याला ताब्यात घेतले तर त्याचा एक साथिदार पळून जाण्यात यशस्वी झाला.

पोलिसांनी प्रदीप जाधव याच्याकडे चौकशी केली असता त्याने ८ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. हे सर्व गुन्हे त्याने त्याच्या साथिदाराच्या मदतीने केले असल्याची कबूली दिली. पोलिसांनी ८ गुन्ह्यातील २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली.
[amazon_link asins=’B078TL3KR6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’74a8d8f6-9961-11e8-b862-fbf36106f34a’]
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस हवालदार युसुफ पठाण, पोलीस नाईक अनिल कुसाळकर, पोलीस शिपाई अमित कांबळे, ज्ञानेश्वर चित्ते, शाहीद शेख, भोजराव यांच्या पथकाने केली.